केंद्राच्या सुकन्या समृद्धी योजनत राज्यातील १0 जिल्ह्यांचा समावेश
By Admin | Updated: January 27, 2015 23:52 IST2015-01-27T23:52:04+5:302015-01-27T23:52:04+5:30
मुलींचा घटता जन्मदर उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे सामूहिक प्रयत्न.

केंद्राच्या सुकन्या समृद्धी योजनत राज्यातील १0 जिल्ह्यांचा समावेश
अकोला : मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता, केंद्र शासनाने डिसेंबर २0१४ मध्ये सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत, राज्यातील १0 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंंत, कुठल्याही टपाल कार्यालयात किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत, तिचे जन्म प्रमाणपत्र सादर करून, केवळ एक हजार रुपयांच्या ठेवीवर पालक खाते उघडू शकतात. मुलीच्या पालकांना या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. मुलगी १0 वर्षांंची होईपर्यंंत तिच्या पालकांना या खात्यातील व्यवहार करता येतील, तर मुलगी १0 वर्षांंची झाल्यानंतर तिला खात्याचे व्यवहार करण्यास पात्र समजले जाईल. या खात्याला २१ वर्षांंची मुदत आहे.
या योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून, बुधवार दिनांक २१ जानेवारी रोजी, राज्यातील उस्मानाबाद, सांगली, जालना, औरंगाबाद, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव, बीड, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांचा समावेश सुकन्या समृद्धी योजनेत करण्यात आला.