पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी दीड लाखांची घरफोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:02 IST2017-11-22T22:42:34+5:302017-11-22T23:02:54+5:30

डाबकी रोडवरील फडके नगरातील रहिवासी तसेच सिव्हिल लाइन पोलीस  ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी  धुडगूस घालीत एक लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दीड लाख रु पयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Hundreds of crores of crores of police personnel were rescued! | पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी दीड लाखांची घरफोडी!

पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी दीड लाखांची घरफोडी!

ठळक मुद्देरोख रकमेसह दागिने पळविलेडाबकी रोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डाबकी रोडवरील फडके नगरातील रहिवासी तसेच सिव्हिल लाइन पोलीस  ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी  धुडगूस घालीत एक लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दीड लाख रु पयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी  डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले माधव वक्टे हे ड्युटीवर होते, तर  त्यांच्या पत्नी रुग्णालयीन कामासाठी रुग्णालयात गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या  घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची फेकाफेक करीत एक लाख रुपयांचे सोने व  चांदीचे दागिने तसेच पंचवीस हजार रुपयांची रोख असा एकूण दीड लाख रुपयांचा  मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला आहे. पोलीस कर्मचार्‍याच्या निवासस्थानी चोरी  झाल्याने पोलीस दलात या चोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, डाबकी रोड  पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथकाने  घटनास्थळाची तपासणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी  घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ  झाल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Hundreds of crores of crores of police personnel were rescued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.