हातपाय तोडण्याची धमकी देऊन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 19:33 IST2017-10-17T19:32:45+5:302017-10-17T19:33:14+5:30
अकोला - खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुल्लानी चौकातील एका मुलीला तिच्या वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हातपाय तोडण्याची धमकी देऊन मुलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुल्लानी चौकातील एका मुलीला तिच्या वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुल्लानी चौकातील रहिवासी रमजान खान सोदाब खान याने याच परिसरातील एका मुलीला स्वत:च्या घरात नेले, त्यानंतर मुलीचा विनयभंग केला. मुलीने विरोध करताच खान याने तिच्या वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. मुलीने कशीबशी या नराधमाच्या तावडीतून सुटका केली, त्यानंतर खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रमजान खान याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.