फोर-जी सेवेमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:00 IST2019-02-10T15:59:57+5:302019-02-10T16:00:09+5:30
अकोला: अकोला जिल्ह्यात फोर-जी सेवा सुरू झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा अतिरिक्त मिळत असून, दर प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठीदेखील बीएसएनएलचे अतिरिक्त चार्जेस नसल्याने त्यांचे ग्राहक वाढत आहेत.

फोर-जी सेवेमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ
अकोला: अकोला जिल्ह्यात फोर-जी सेवा सुरू झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा अतिरिक्त मिळत असून, दर प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठीदेखील बीएसएनएलचे अतिरिक्त चार्जेस नसल्याने त्यांचे ग्राहक वाढत आहेत.
महाराष्ट्रातील बीएसएनएलच्या फोर-जी सेवा प्रदान करण्यात अकोल्याचा क्रमांक अव्वल गणला जातो. अकोलापाठोपाठ भंडारा, लातूर, परभणी आदी ठिकाणी फोर-जी सेवा सुरू झाली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता ही सेवा चांगली झाली आहे. सोबतच प्लॅनमध्ये अनेक बदल केल्याने इतर सेल्युलर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलची सेवा स्वस्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या वाढत आहे. इतर कंपन्यांनी प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठी छुपे दर सुरू केले आहेत. त्या तुलनेत बीएसएनएलची लूट नाही. त्याचाही परिणाम ग्राहकांवर पडत आहे.
दरमहा हजार-पाचशेंच्या संख्येने बीएसएनएलचे ग्राहक वाढत आहेत. अनेकांनी पोर्टिंगमधून बीएसएनएल सेवा स्वीकारली आहे. त्यामुळे भविष्यात बीएसएनएलला चांगले दिवस येत आहेत.
-पवनकुमार बारापात्रे, महाप्रबंधक, बीएसएनएल अकोला.