एदलापूर येथे संत्रा बागेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 01:58 IST2017-04-17T01:58:48+5:302017-04-17T01:58:48+5:30
अकोट : अकोट तालुक्यातील एदलापूर येथील भीमराव गोंडूजी वानखडे यांच्या शेतशिवारातील संत्र्याची झाडे आगीमध्ये होरपळून गेली.

एदलापूर येथे संत्रा बागेला आग
अकोट : अकोट तालुक्यातील एदलापूर येथील भीमराव गोंडूजी वानखडे यांच्या शेतशिवारातील संत्र्याची झाडे आगीमध्ये होरपळून गेली. १६ एप्रिल रोजी सकाळी शेतात गेले असता गहू काढणीनंतर शेतातील कचरा जळालेला दिसला. या आगीत संत्र्याची झाडे व स्प्रिंकलर जळालेले दिसले. अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याबाबतची चौकशी व्हावी, यासाठी हिवरखेड पोलिसांना कळविण्यात आले, तर घटनास्थळावर तलाठी स्नेहल वाघमारे, सरपंच, तसेच पंजाबराव पाचपाटील, करुणा पाचपाटील यांनी पाहणी केली.