अखेर बोंडअळी नुकसानीसाठी ३६ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:07 IST2018-05-15T14:07:16+5:302018-05-15T14:07:16+5:30
अकोला: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीने केलेल्या नुकसानाची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाखांऐवजी प्राप्त ३६ कोटी १४ लाख निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या टक्केवारीनुसार सोमवारी तहसील कार्यालयांना वाटप केला.

अखेर बोंडअळी नुकसानीसाठी ३६ कोटींचा निधी
अकोला: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीने केलेल्या नुकसानाची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाखांऐवजी प्राप्त ३६ कोटी १४ लाख निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या टक्केवारीनुसार सोमवारी तहसील कार्यालयांना वाटप केला. शासनाने एकूण मागणीच्या निधीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे जाहीर केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील रकमेतही २० टक्के कपात केल्याचे वृत्त लोकमतने रविवारीच प्रसिद्ध केले, हे विशेष.
शासनाने १७ मार्च २०१८ रोजी बोंडअळीने बाधित कपाशीला ‘एनडीआरएफ’च्या निकषाने मदत देण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ८ मे रोजी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आवश्यक १३५.५१ कोटींच्या मदतनिधीस मान्यता देऊन तो निधी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जाईल, असा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात शेतकºयांना अनुज्ञेय असणारा निधी वाटप केल्यानंतर दुसरा टप्पा दिला जाईल, असेही स्पष्ट केले. समान हप्त्यानुसार, जिल्ह्यासाठी मिळणाºया ४५.१७ कोटींऐवजी ३६.१४ कोटी एवढाच निधी उपलब्ध होणार असल्याचे लोकमतने रविवारीच प्रसिद्ध केले. त्यामध्ये सोमवारी निधी जिल्ह्यात वितरित होणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यासाठी पात्र ३६ कोटी १४ लाख रुपये निधी त्या-त्या तालुक्याच्या मागणीच्या टक्केवारीनुसार वाटप केला.
- राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतील मदत अडकली
केंद्र सरकार शेतकºयांचे कैवारी असल्याचा आव आणत असतानाच बोंडअळीच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ) मदतीचा निधी अद्यापही राज्य शासनाला दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या हिश्शाचा निधी वाटप झाला. केंद्र शासनाकडून निधी मिळाल्यानंतर उर्वरित ६.३३ टक्के निधी जिल्हाधिकाºयांना मिळण्याची शक्यता आहे.