बेवारस कारमध्ये सापडला आठ किलो गांजा!
By Admin | Updated: April 7, 2017 00:31 IST2017-04-07T00:31:27+5:302017-04-07T00:31:27+5:30
अकोला : गुडधीमध्ये बेवारस स्थितीत आढळून आलेल्या कारमध्ये आठ किलो गांजा सापडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

बेवारस कारमध्ये सापडला आठ किलो गांजा!
अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा: कार व गांजा जप्त
अकोला : गुडधीमध्ये बेवारस स्थितीत आढळून आलेल्या कारमध्ये आठ किलो गांजा सापडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सिव्हिल लाइन पोलिसांनी गांजा व कार जप्त करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुडधी परिसरात कारमध्ये गांजा कोणी आणला आणि कार बेवारस सोडून आरोपी कुठे पळाले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
गुडधीमध्ये काल रात्रीपासून एमएच 0२ जे ७५६७ क्रमांकाची एक बेवारस कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कारमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारची तपासणी केली असता, कारमध्ये आठ किलो गांजा आढळला. या गांजाची किंमत ३४ हजार रुपये आहे. हा गांजा कारने आणणारे व कार बेवारस सोडून पळून जाणारे कोण याचा शोध सिव्हील लाईन्स पोलीस घेत आहेत.