शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला; नऊ जण जखमी
By Admin | Updated: April 4, 2017 15:40 IST2017-04-04T15:40:57+5:302017-04-04T15:40:57+5:30
सोनखास शिवारातील शेतात शेतमजूर हळद काढत असताना अचानकपणे मधमाश्यांनी त्या मजुरांवर हल्ला चढविला.

शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला; नऊ जण जखमी
पिंजर (अकोला ): आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सोनखास शिवारातील शेतात शेतमजूर हळद काढत असताना अचानकपणे मधमाश्यांनी त्या मजुरांवर हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले. गावकऱ्यांनी मिळेल त्या त्या वाहनांनी जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथे दाखल केले. घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, विवेक गावंडे, आणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे आणी मंडळींनी जखमींना धिर देत. पथकाच्या जवानांनी लगेच बरफाचे टुकडे आणुन मधमाशांचे काटे काढण्यास सुरवात केली. जागेवर वेळीच योग्य उपचार करुन जखमीपैकी.संतोष रामकृष्ण महल्ले, निकीता संतोष पवार, कांताबाई गोपीचंद जाधव, राहणार मोझरी खु. या तिघांना अकोला येथील जिल्हा रुग्णालय उपचारासाठी पाठविण्यात आले.