कुकडी कालव्यावरील भरारी पथकास दमबाजी : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:29 IST2018-05-23T18:29:17+5:302018-05-23T18:29:51+5:30
कुकडी कालव्यावर पाण्याचे नियोजन करीत असलेल्या भरारी पथकाने पाणी उपसा करीत असलेल्या विद्युत पंपाचे पाईप काढल्याचा राग धरुन राजाराम प्रभाकर दळवी, संजय प्रभाकर दळवी व इतर दहा ते बारा जणांच्या जमावाने देऊळगाव (ता. श्रीगोंदा) यांनी भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश लंकेश्वर व इतरांना शिविगाळ करुन बंद केलेले पंप जबरदस्तीने पुन्हा सुरु केले.

कुकडी कालव्यावरील भरारी पथकास दमबाजी : दोघांना अटक
श्रीगोंदा : कुकडी कालव्यावर पाण्याचे नियोजन करीत असलेल्या भरारी पथकाने पाणी उपसा करीत असलेल्या विद्युत पंपाचे पाईप काढल्याचा राग धरुन राजाराम प्रभाकर दळवी, संजय प्रभाकर दळवी व इतर दहा ते बारा जणांच्या जमावाने देऊळगाव (ता. श्रीगोंदा) यांनी भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश लंकेश्वर व इतरांना शिविगाळ करुन बंद केलेले पंप जबरदस्तीने पुन्हा सुरु केले. मंगळवारी २२ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कुकडी कालवा डी वाय चारी क्रमांक १२ नजीक ही घटना घडली.
भरारी पथकाचे प्रमुख लंकेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलिसांनी संजय दळवी, राजाराम दळवी यांना अटक केली आहे. लंकेश्वर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक कुकडी कालव्यावर गस्त घालत होते. हे पथक डी वाय १२ जवळ आले असताना एक विद्युत पंप चालू असल्याचे निदर्शनास आले.
पथकातील कर्मचाऱ्यांनी पंप बंद करून पाईप बाजुला काढले. याचा राग येऊन दळवी यांच्यासह दहा ते बारा जणांना एकत्र करून पथकातील कर्मचाºयांना शिविगाळ केली. इतर शेतक-यांना पंप चालू करण्यास सांगितले. शिविगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन श्रीगोंदा पोलिसांनी वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.