कांचनवाडी येथे परप्रांतीय वीटभट्टी मजूर भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:29 IST2018-02-02T13:29:00+5:302018-02-02T13:29:25+5:30
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणच्या कांचनवाडी येथे वीटभट्टीवर काम करणा-या बहिण-भाऊ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

कांचनवाडी येथे परप्रांतीय वीटभट्टी मजूर भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाणच्या कांचनवाडी येथे वीटभट्टीवर काम करणाºया बहिण-भाऊ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कांचनवाडी येथे संतोष चौहान यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर काम करण्यासाठी उत्तरप्रदेशमधून कुटूंब आले होते. गुरुवारी बारा वाजण्याच्या सुमारास या मजूर कुटुंबात वाद झाले. त्यामुळे सुगर श्रीराम कुमार (वय १६) या अल्पवयीन मुलीने वीटा बनविण्यासाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उडी मारली. ती गटांगळ्या खाऊ लागल्याने तिचा सख्खा भाऊ दिनेश श्रीराम कुमार (वय २५) याने तिला वाचविण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. परंतु चिखलात अडकून दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.