नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

By अण्णा नवथर | Published: August 2, 2023 02:49 PM2023-08-02T14:49:00+5:302023-08-02T14:49:32+5:30

या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

attack on college students in ahmednagar | नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

googlenewsNext

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: नगर शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी ( दि. २) दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. युवराज गणेश गुंजाळ ( रा. सोनेवाडी, ता. नगर ) असे हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.  दरम्यान राष्ट्रवादी काँग्रसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी विद्यार्थ्याची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अशी माळीवाडा येथून बसमध्ये बसून हा विद्यार्थी न्यू आर्टस महाविद्यालयात येत होता. प्रवासादरम्यान सीटवर बसण्यावरून त्याचे बसमधील काही मुलांशी भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. दरम्यान युवराज यास मारहाण करणाऱ्यांनी बसूनमधून त्यांच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. युवराज महाविद्यालयाच्या गेटवर उतरताच त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला असून, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधूकर साळवे हे फौजफाट्यासह महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेतला. मात्र ते अद्याप मिळून आले नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक साळवे यांनी दिली.

Web Title: attack on college students in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.