शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

झुंबा करा अन् वजन घटवा !

By admin | Updated: February 14, 2017 01:38 IST

घरकाम आणि व्यस्त दिनचर्येमुळे अनेक जण जीममध्ये जाऊ शकत नाही.

सखी मंचतर्फे खास कार्यशाळा : ईशा डांग शिकविणार फिटनेसचे तंत्रयवतमाळ : घरकाम आणि व्यस्त दिनचर्येमुळे अनेक जण जीममध्ये जाऊ शकत नाही. त्यांच्या आहारातही अनियमितता येऊन शरीरात स्थूलता वाढते. आता यवतमाळात प्रथमच ‘झुंबा वर्कशॉप’च्या माध्यमातून शरीराची निगा राखण्याची संधी आली आहे. काहीसा नृत्यशैलीकडे झुकणारा हा व्यायामाचा प्रकार आहे. असा हा आगळावेगळा झुंबा शिकविण्यासाठी सखी मंचतर्फे येत्या १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत ईशा डांग यांची कार्यशाळा होणार आहे.‘डान्सफिट’ संस्थेच्या माध्यमातून लोकमत सखी मंचतर्फे ही कार्यशाळा आयोजित आहे. ईशा डांग या डान्सफिट संस्थेच्या संस्थापक आहेत. मान्यताप्राप्त झुंबा व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यासोबतच ‘बोक्वा’ आणि ‘बॉली भांगडा’ या प्रकारातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावला आहे. सुदृढ आरोग्य आणि पूरक आहार याबाबत त्यांनी प्रशिक्षकही तयार केले आहेत. त्यांनी पूर्ण राज्यात विविध ठिकाणी त्यांचे झुंबा क्लासेस झालेले आहेत. लोकमत सखी मंचच्या माध्यमातून ईशा डांग आता यवतमाळात झुंबा हा फिटनेसचा मंत्र शिकविणार आहेत. कार्यशाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एकंदरच शारीरिक तंदुरुस्तीबद्दल प्राथमिक मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासोबतच झुंबाची माहिती दिली जाईल. ईशा डांग यांचा मास्टर क्लास होईल. बेसिक अ‍ॅब्स ट्रेनिंग, हेवी कार्डिओ, यासोबतच आहारविषयक माहिती दिली जाईल. तिसऱ्या दिवशी सर्किट ट्रेनिंग, घरी करायचे ‘वर्कआउट’, झुंबा अ‍ॅडव्हान्स हे प्रकार शिकविले जाणार आहे. क्रॉसफिट, टबाटा, फंक्शनल फिटनेस, सर्किट ट्रेनिंग, मॅट पिलेट्स, पॉवर योगा, प्लिओमेट्रिक्स, कॅलिस्थेनिक्स असे विविध व्यायामप्रकारही या कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत. प्रकल्प अधिकारी म्हणून अलका राऊत (९९२२६६१४८७), विद्या बेहरे (९५४५९८२५५३), किरण इंगळे (८८८८०७७७२७), छाया राठी (९४२०६२२७९९), वर्षा बेलसरे (९८६०४६६२१६), शुभदा हातगावकर (९८९०७७९४३४), स्मिता गंधे (८८८८४८४५७०), सोनल देशमुख (८६६८९७१३४६) या काम पाहत आहेत. अधिक माहिती व वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका सीमंतिनी पडाळकर (०७२३२-२४८११९) व प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन लोकमत सखी मंच जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)असे असेल तीन दिवसीय प्रशिक्षणझुंबा प्रशिक्षणासाठी वुडन फ्लोअरची आवश्यकता असल्याने यवतमाळातील दारव्हा रोडस्थित हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाच्या जवाहरलाल दर्डा इन्डोअर स्टेडियममध्ये (पी-१० एमआयडीसी, ओरिएन्ट सिन्टेक्सच्या बाजूला) हे तीन दिवसीय झुंबा वर्कशॉप होणार आहे. दररोज पाच बॅचेसमध्ये प्रशिक्षण होणार असून प्रत्येक बॅच दीड तासांची असेल. सकाळी ७.३० ते ९ आणि ९ ते १०.३० अशा दोन बॅचेस होतील. तर दुपारी ३.३० ते ५, सायंकाळी ५ ते ६.३० आणि सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत तीन बॅचेस होणार आहेत. या वर्कशॉपमध्ये महिला, मुले, मुली सहभागी होऊ शकतील. सखी मंचच्या सदस्यांकरिता व त्यांच्या मुला-मुलींकरिता प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आहे. सखी मंचच्या सदस्य नसलेल्या महिला व मुला-मुलींसाठी प्रत्येकी ६०० रुपये शुल्क आहे. महिला, मुले, मुली एका बॅचमध्ये असू शकतील. कोणत्याही एका बॅचमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. वर्कशॉपच्या ठिकाणी सखी मंचची सदस्य नोंदणी सुरू राहील. नॉर्मल कॉटन टि शर्ट, जिन्स पँट, फ्रँक पँट, सलवार सुट, शूज असा ड्रेसकोड राहील. वर्कशॉपसाठी येताना पिण्याचे पाणी आणि नॅपकीन सोबत अवश्य घेऊन यावे.झुंबा म्हणजे काय?तीन दिवसीय कार्यशाळेत ईशा डांग प्रामुख्याने झुंबा आणि बोक्वा हे प्रकार शिकविणार आहेत. झुुंबा नृत्य वाटावे अशा प्रकारचा व्यायाम आहे. शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी तो उपयुक्त आहे. वाद्याच्या तालावर हा व्यायाम करताना शरीरातील अतिरिक्त ऊर्जा जळते. म्हणजेच चरबी कमी होते. महिलांना घरच्या घरी हा व्यायाम करून वजन कमी करता येते. तारुण्याप्रमाणे फिटनेस मिळविण्यासाठी झुंबा हा प्रकार उपयोगी ठरतो.