शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

झरी सर्वात छोटी नगरपंचायत

By admin | Updated: September 6, 2015 02:27 IST

शासनाने तालुकास्तरावर नगरपंचायतींची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परिणामी झरीसारख्या अतिशय कमी लोकसंख्येच्या ठिकाणी ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले.

लोकसंख्या कमीच : तूर्तास केवळ ११०० मतदार, नवीन मतदार यादी तयार होणारविठ्ठल पाईलवार झरीशासनाने तालुकास्तरावर नगरपंचायतींची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परिणामी झरीसारख्या अतिशय कमी लोकसंख्येच्या ठिकाणी ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. येत्या दोन महिन्यात आता निवडणुकही होणार आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर झरी ही राज्य आणि देशातीलही सर्वात कमी मतदार संख्या असलेली नगरपंचायत ठरणार आहे.झरी तालुक्याची सर्वात लहान तालुका म्हणून ओळख आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांच्या प्रयत्नाने २२ वर्षांपूर्वी १५ आॅगस्ट १९९२ रोजी झरी तालुक्याची निर्मिती झाली. त्यावेळी झरी तालुका कोणत्याच निकषात बसत नव्हता. मात्र कासावार यांनी त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्यामुळे अखेर हा झरी तालुका अस्तित्वात आला. त्यावेळी लगतच्या जामणी गावाला यात समाविष्ट करून झरीजामणी तालुका निर्माण झाला. तालुक्याची स्थापना झाली, तेव्हा या गावाची लोकसंख्या एक हजारांच्याही आतच होती, हे विशेष.त्यावेळी आणि आजही मुकुटबन, पाटण ही मोठी आहेत. मात्र या गावांना डावलून कासावार यांनी झरी या अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल गावाला तालुक्याचा दर्जा मिळवून दिला होता. मात्र झरीला साधी नगरपरिषदही नव्हती. आता झरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे गावाचा विकास, पाणी, रस्ते, स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत प्राप्त होत आहे.सध्याच्या झरीजामणी तालुक्यात मुकुटबन ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तालुक्यात ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानली जाते. तेथील लोकसंख्या सात हजार २९० असून एकूण चार हजार ७०९ मतदार आहे. त्यात तब्बल दोन हजार २६८ महिला मतदार आहेत. तेथे पाच प्रभाग असून एकूण १५ सदस्य आहेत. मुकुटबन सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनसुद्धा आता झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या गावाचा कायापालट होण्याची शक्यता बळावली आहे. झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या २ आॅगस्टला येथील तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. झरी व शिरोला या दोन गावांमिळून पूर्वी ग्रामपंचायत होती. आताही या दोन गावांमिळूनच नगरपंचायत बनली आहे. या नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग राहणार आहे. त्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असल्याने या प्रवर्गासाठी सर्वाधिक जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १, २, ५, १५ हे प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. सोबतच अनुसूचित जमाती महिलेसाठी प्रभाग क्रमांक ४, ७, ९, १०, ११ व १४ आरक्षित आहे. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक ३ राखीव आहे. प्रभाग क्रमांक ८, १२, १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी, तर प्रभाग क्रमांक १३ व १६ हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे.झरी गावाची सध्याची लोकसंख्या जेमतेम एक हजार ५३५ असून शिरोला या गावाची लोकसंख्या केवळ २४० आहे. या दोन्ही गावांमिळून केवळ एक हजार ७७५ लोकसंख्या आहे. विशेष म्हणजे त्यात केवळ एक हजार ९२ मतदार आहेत. त्यात झरीचे ८६९, तर शिरोलाचे केवळ २२३ मतदार आहेत. आता नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याने नवीन मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्यातही फारशी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. कमी मतदार आणि १७ प्रभाग असल्याने येथे अत्यंत मनोरंजक स्थिती निर्माण झाली आहे.विजयासाठी लागणार ३० ते ४० मतेझरीलगत काही गटग्रामपंचायती असल्याने त्यांना नगरपंचायतीत सामावून घेणे कठीण जात आहे. आता निवडणूक तारीख निश्चित झाली नसली, तरी अनेकांना सत्तेचे स्वप्न पडू लागले आहे. मोर्चेबांधणी व कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. भावी उमेदवारांना निवडून येणे सोपे वाटू लागले आहे. कमी मतदार असलेल्या प्रभागात दोन-तीन उमेदवार रिंगणात राहिल्यास, केवळ ३0 ते ३0 मते मिळवूनही विजय प्राप्त करणे शक्य झाले आहे. प्रभाग जास्त असल्याने अनेकांना लाभ घेता येईल व त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे गावाचा विकास, पाणी, रस्ते, स्वच्छतेचा प्रश्न सुटण्याची शक्यता बळावली आहे.एका प्रभागात तर केवळ ८९ मतदारझरी नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वाधिक १२८ मतदार आहे, तर प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वात कमी केवळ ८९ मतदार आहे. नवीन मतदार यादीतही त्यात मोठी भर पडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला निवडून येण्यासाठी फार फसरत करावी लागणार नाही. मात्र मतदारांची प्रचंड ओढाताण होण्याची शक्यता आहे, असे जाणकारांचे मत आहे. अनुसूचित जमातीची टक्केवारी ६४.७३ आहे. लगतच्या गावांतील काही गावपुढाऱ्यांनी या नगरपंचायतीत आपली गावे समाविष्ट करण्यासाठी धडपड केली होती. मात्र ती वांझोटीच ठरली.