शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात भाजपाचा नव्या चेहऱ्यावर भर

By admin | Updated: August 26, 2014 23:43 IST

भारतीय जनता पक्षात यावेळी ‘इलेक्टीव्ह मेरिट’वर उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळेच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नव्या चेहऱ्यावर भर दिला जात आहे.

विधानसभा निवडणूक : तीन मतदारसंघात जुन्यांचीच चाचपणीयवतमाळ : भारतीय जनता पक्षात यावेळी ‘इलेक्टीव्ह मेरिट’वर उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळेच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नव्या चेहऱ्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील सात पैकी राळेगाव, आर्णी, यवतमाळ आणि उमरखेड हे चार मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहेत. या चारही मतदारसंघात पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी जुन्याच नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. भाजपात आतापर्यंत शिफारसींवर उमेदवारी दिली जात होती. परंतु आता निवडून येण्याची क्षमता, सर्वेक्षण याबाबी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. चेहरा जुना असेल तर खरोखरच तो निवडून येऊ शकतो का याची चाचपणी पक्ष वेगवेगळ्या एजंसीमार्फत करीत आहे. या सर्वेक्षणातून बरेच चित्र स्पष्ट होत असून त्याबाबत भाजपाच्या गोटात नेत्यांमध्ये चर्चाही ऐकायला मिळते. त्यानुसार आर्णी, राळेगाव आणि उमरखेड या तीन मतदारसंघात पुन्हा एकदा जुन्यांपैकीच उमेदवारांना मैदानात उतरविण्याचा विचार भाजपा श्रेष्ठी करीत असल्याचे बोलले जाते. यवतमाळात मात्र नव्या चेहऱ्याला वाव आहे. यापूर्वी निवडणूक लढविल्याचा अनुभव असलेल्या भाजपातील दोनही उमेदवारांची नावे मागे पडली आहे. तिसऱ्याच आणि पक्षासाठी नव्या असलेल्या उमेदवाराच्या नावावर भर दिला जात आहे. वास्तविक या उमेदवारानेही एकदा विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु त्यावेळी ते पक्षात नव्हते, हे विशेष. त्यामुळेच त्यांच्या नावावर चर्चा थांबलेली आहे. भाजपातील प्रबळ दावेदार उमेदवाराचे भविष्यात महायुतीची सत्ता आल्यास महामंडळावर पुनर्वसन करण्याबाबत शब्द दिला जाणार आहे. उमेदवारी कुणालाही मिळो, सर्वांनी एकोप्याने पक्षाचे काम करावे हाच श्रेष्ठींचा आदेश आहे. वास्तविक नवा चेहरा म्हणून ज्या उमेदवाराकडे पक्षश्रेष्ठी पाहत आहे, त्याचीही पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. पोटनिवडणुकीत प्रबळ दावेदाराला त्याचा अनुभवसुद्धा आला आहे. आर्णी मतदारसंघात एका नेत्याने आपल्या पक्ष प्रवेशाच्या अटीवर नवख्या उमेदवाराचे नाव रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र श्रेष्ठींना त्यांच्या अटी मान्य नाही. प्रदेश नेत्यांशी बोलून पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. तेथे श्रेष्ठींकडून डॉक्टरची नाडी तपासली जाणार आहे. राळेगाव मतदारसंघात काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी विरोधी पक्षाने सर्व मिळून एकच उमेदवार देण्याचा विचार चालविला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा प्राध्यापकाचा विचार केला जात आहे. उमरखेडमध्येसुद्धा भाजपाच्या उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा असली तरी मागचाच उमेदवार कायम असल्यास काय स्थिती राहू शकते, याचा आढावा पक्षाकडून घेतला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)