शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ वर्ल्डकप फुटबॉल फिव्हर स्पर्धा

By admin | Updated: May 31, 2014 00:14 IST

जून महिन्यात ब्राझील देशात होणार्‍या विश्‍वकप फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर यवतमाळ जिल्हय़ात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेहरू स्टेडियम येथे १ ते ५ जून

यवतमाळ : जून महिन्यात ब्राझील देशात होणार्‍या विश्‍वकप फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर यवतमाळ जिल्हय़ात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेहरू स्टेडियम येथे १ ते ५ जून या कालावधीत वर्ल्डकप फुटबॉल फिव्हर स्पर्धा व फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि न्यू लाईफ फुटबॉल क्लबद्वारा या नाविण्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ वर्षाआतील मुलांकरिता या स्पर्धा असून यात अमरावती, अकोला, पुसद,  दारव्हा, वणी व यजमान यवतमाळचे संघ सहभागी होणार आहे.संपूर्ण जगात विशेषत: युरोप, अफ्रिका व अमेरिका खंडात फुटबॉल खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या खेळाची देशात लोकप्रियता वाढावी, दज्रेदार खेळाडू तयार व्हावेत, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या हेतूने प्रथमच शासकीय स्तरावर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या पुढाकाराने या स्पर्धा व फुटबॉल कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी पत्रपरिषदेत दिली. १ ते ५ जूनपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. १ जून रोजी सायंकाळी ४.३0 वाजता नेहरु स्टेडियम येथून फुटबॉल खेळाडूंची रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. २ जूनपासून दररोज सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत फुटबॉलचे साखळी सामने होतील. या व्यतिरिक्त फुटबॉल कार्यशाळेत २ जूनला सकाळी १0 वाजता फुटबॉल खेळाचे तांत्रिक कौशल्य याविषयावर राज्य क्रीडा मार्गदर्शक धीरज मिश्रा मार्गदर्शन करणार आहे. रात्री ८ वाजता खेळाडूंसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन होईल. ३ जूनला सकाळी १0 वाजता डॉ. जावेद सौदागर यांचे ‘प्रथमोपचार व खेळातील इजा’ याविषयावर मार्गदर्शन होईल. रात्री ९ वाजता ‘कॅम्प फायर ट्रेझर हंट’ हा नाविण्यपूर्ण कार्यक्रम, ४ जूनला सकाळी ८.३0 वाजता प्राची दत्ता यांचे आहाराविषयी मार्गदर्शन तर डॉ.बाळासाहेब साखरे यांचे योगा मार्गदर्शन. ५ जून रोजी ६ ते सायंकाळच्या सत्रात फुटबॉल उपांत्य सामना ज्येष्ठ फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक हरिहर मिश्रा यांचे व्याख्यान, सायंकाळी ५ वाजता फुटबॉल फिव्हर स्पर्धेचा अंतिम सामना, बक्षीस वितरण व समारोप असे पाच दिवस भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत.पत्रपरिषदेला धीरज मिश्रा, न्यु लाईफ फुटबॉल क्लबचे राजेश कळसकर आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)