शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ, नागपूर संघ अंतिम फेरीत दाखल

By admin | Updated: March 5, 2017 01:05 IST

येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने

विदर्भस्तर महिला हॉकी : तिसऱ्या स्थानासाठी गडचिरोली-अमरावती झुंजणार, आज समारोप व बक्षीस वितरण यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने अमरावती संघाचा, तर नागपूर संघाने बलाढ्य गडचिरोली संघाचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. रविवारी, ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता यवतमाळ-नागपूर असा अंतिम सामना रंगणार आहे. हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ आणि वुमेन्स हॉकी क्लब यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सात संघांनी सहभाग नोंदविला आहे. शनिवारी पहिला उपांत्य सामना नागपूर विरुद्ध गडचिरोली संघादरम्यान झाला. प्रारंभापासून नागपूर संघाने आक्रमक खेळ करून व्यूहरचना केल्या. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला गडचिरोलीच्या पल्लवी मेश्रामने गोल करण्याची नामी संधी गमावली. त्यानंतर १४ व्या मिनिटात नागपूरच्या संगीता मेश्रामने दिलेल्या सुरेख पासच्या बळावर सुनीता यादवने संघासाठी पहिला गोल केला. त्यानंतर १९ व्या मिनिटात मोनू प्रधानने दुसरा गोल करीत नागपूर संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर गडचिरोली संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. या स्पर्धेत जळगावचा संघ न आल्याने यजमान यवतमाळ संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. उपांत्य सामन्यात त्यांनी अमरावती संघाचा १ विरुद्ध ० गोलने पराभव करून अंतिम फेरी गाठली. सुप्रिया पाईकराव हिने सामन्याच्या पहिल्याच मिनिटात विजयी गोल केला. दरम्यान, सकाळच्या सत्रात गडचिरोली संघाने परभणी संघाचा ८ विरुद्ध ० गोलने दणदणीत पराभव केला. सोनाली हेमके हिने सर्वाधिक तीन गोल केले, तर अश्विनी गोंडोले, आंचल दोनाडकर यांनी प्रत्येकी २-२, तर प्रगती शेलोकार हिने १ गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. नागपूर विरुद्ध चंद्रपूर विरूद्धच्या सामन्यात नागपूर संघाने ३ विरूद्ध ० गोलने विजय साजरा केला. अमरावती विरूद्ध भंडारा संघादरम्यान चुरशीचा सामना झाला. या सामन्यात अमरावती संघाने २ विरूद्ध १ गोलने विजय प्राप्त केला. भंडारा संघाच्या दीक्षा पचारेने ८ व्या मिनिटात पहिला गोल करून आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत आघाडी टिकून होती. त्यानंतर अमरावतीच्या शुभांगी हरणे हिने ३६ व्या मिनिटात गोल करून १-१ गोलने बरोबरी केली. ३९ व्या मिनिटात साक्षी जामनिलने दुसरा गोल करून अमरावती संघाचा विजय निश्चित केला. या स्पर्धेत स्पर्धा निरीक्षक म्हणून विदर्भ हॉकी संघटनेचे प्रमोद जैन, प्रा. कुणाल पाटील जबाबदारी सांभाळत आहे. पंच म्हणून अतुल येवले, धनराज झोंबाडे यांनी काम पाहिले. रविवारी सकाळी ८ वाजता गडचिरोली विरूद्ध अमरावती संघादरम्यान तिसऱ्या स्थानासाठी सामना रंगणार आहे. बक्षीस वितरण व समारोप दुपारी १ वाजता होईल. (क्रीडा प्रतिनिधी)