शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपरिषदेकडे थकीतदारांची यादीच नाही

By admin | Updated: March 30, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा मार्च एन्डींगमुळे आपल्या थकबाकीदार करधारकांकडे वसुलीसाठी येरझारा मारीत असताना

मालमत्ता कर : प्रशासन गंभीर नाही, नगरसेवकांना निधीची प्रतीक्षा यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा मार्च एन्डींगमुळे आपल्या थकबाकीदार करधारकांकडे वसुलीसाठी येरझारा मारीत असताना जिल्हा मुख्यालयाची यवतमाळ नगरपरिषद मात्र त्याला अपवाद ठरली आहे. या नगरपरिषदेकडे मालमत्ता कराच्या थकबाकीदारांची अपडेट यादीच नसल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ ही जिल्ह्यातील सर्वात मोठी अ वर्ग नगरपरिषद आहे. आता हद्दवाढ झाल्याने या नगरपरिषदेची जबाबदारी वाढली आहे. नगरपरिषदेला समाविष्ठ आठ ग्रामपंचायत क्षेत्रातून विविध करांच्या माध्यमातून वाढीव उत्पन्न मिळणार आहे. त्याच वेळी या समाविष्ठ क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर आहे. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. पर्यायाने नगरपरिषदेने आपली विविध करातील थकबाकी वसूल करणे, उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात नगरपरिषदेचे प्रशासन व अधिनस्त यंत्रणा या थकीत कराच्या वसुलीबाबत तेवढे गंभीर नसल्याचे आढळून आले. मार्च महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. नगरपरिषदेचे लाखो रुपये मालमत्ता व अन्य करांच्या माध्यमातून नागरिकांकडे थकीत आहे. परंतु त्यानंतरही नगरपरिषदेची ही थकबाकीदारांची यादी अपडेट नाही. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदा या थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रांमधून प्रकाशित करुन त्यांच्यावर कर भरण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव निर्माण करीत आहे. तर या उलट स्थिती यवतमाळ नगरपरिषदेची आहे. तेथे वसुलीसाठी दबाव निर्माण करणे तर दूर कुणाकुणाकडे किती-किती रक्कम व केव्हापासून थकीत आहे, याचा सुधारित लेखाजोगाच नगरपरिषद प्रशासनाकडे नाही. विशेष असे खुद्द नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी स्वत: ‘लोकमत’शी बोलताना ही बाब कबूल केली. मालमत्ताधारकांची यादी अपडेट नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन नगरपरिषद प्रशासन व त्यांच्या अधिनस्त यंत्रणेची कर्तव्यदक्षता व कार्यतत्परता उघड होते. याबाबीकडे नगरपरिषदेचे पदाधिकारी व विकास निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरसेवकांनी लक्ष देणे, प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित आहे. परंतु सध्याची कार्यप्रणाली पाहता नगर परिषदेचे प्रशासन लोकप्रतिनिधींनाही जुमानत नसल्याचे विदारक चित्र आहे. आता नगरपरिषदेचे पदाधिकारी व विविध पक्षांचे नगरसेवक या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)