शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ मेकओव्हर

By admin | Updated: January 22, 2015 02:11 IST

शतकाचा वारसा लाभलेल्या यवतमाळ शहराचा मेकओव्हर सुरू असून दारव्हा मार्गावरील पथदिव्यांमुळे रात्री यवतमाळचे रुप महानगरासारखे दिसत आहे.

यवतमाळ : शतकाचा वारसा लाभलेल्या यवतमाळ शहराचा मेकओव्हर सुरू असून दारव्हा मार्गावरील पथदिव्यांमुळे रात्री यवतमाळचे रुप महानगरासारखे दिसत आहे. एवढेच नव्हे तर खेळासाठी मैदान आणि आरोग्य सुविधांसाठी नवे शल्यचिकीत्सालय उभारले जाणार आहे. सह्यांद्री पर्वत रांगेच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या यवतमाळला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. काही ऐतिहासिक वास्तु नागरिकांचे लक्ष वेधुन घेतात. यामध्ये प्रामुख्याने नगरभवन आणि केदारेश्वर शिवालयाचा समावेश होता. आता या वैभवात आणखी काही नव्या संकल्पना भर घालणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ता दुभाजक आणि यवतमाळ-दारव्हा मार्गाच्या चौपदरीकरण आणि सौंदर्यीकरणाचा समावेश आहे. हा मार्ग औद्योगिक वसाहतीपर्यंत सुसज्ज करण्यात आला आहे. या रस्त्याच्या मधोमध पथदिवे लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात प्रवेश करताच महानगरात प्रवेश करत असल्याचा भास होतो. यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोस्टल मैदानाच्या गॅलरी खालचा खुला भाग घाणीने बरबटला होता. आता या ठिकाणी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून गॅलरी खालचा भाग दुकानात रूपांतरित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने आपल्या परिसरात पवनचक्की आणि सौर ऊर्जा बसविले आहेत. यामुळे कार्यालयाचा विजेचा खर्च वाचण्यास मदत झाली आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्राची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शल्यचिकीत्सक विभागाने पोस्टल मैदानावर समोरील भागात इमारत उभारली आहे. १०० खाटांचे हे रूग्णालय असणार आहे. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा परिसर सुशोभित करण्यासोबत जिल्हा कचेरी आणि पोेलीस मैदानाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. विश्रामगृहाचा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यावर भर दिला जात आहे. या ठिकाणी बगिच्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)