शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

जलस्वराज्यतून यवतमाळ बाद

By admin | Updated: June 4, 2014 00:21 IST

गावागावात तीव्र पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाही यवतमाळ जिल्ह्याला जलस्वराज्य टप्पा - २ प्रकल्पातून वगळण्यात आले. केंद्र शासनाच्या योजनेतून बाद झालेला जिल्हा हे जिल्ह्यातील

पाणीटंचाई कायम : राजकीय-प्रशासकीय अपयशाचा फटका यवतमाळ : गावागावात तीव्र पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाही यवतमाळ जिल्ह्याला जलस्वराज्य टप्पा - २ प्रकल्पातून वगळण्यात आले. केंद्र शासनाच्या योजनेतून बाद झालेला जिल्हा हे जिल्ह्यातील राजकीय नेते आणि प्रशासनाचे अपयश मानले जात आहे. जलस्वराज्यच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु त्यात पाणीटंचाई असलेल्या संपूर्ण गावांचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जलस्वराज्य टप्पा - २ ची प्रतीक्षा होती. अखेर या दुसर्‍या टप्प्याला शासनाने मंजुरी दिली. परंतु या टप्प्यातून यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये राजगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने होणारा टँकरने पाणीपुरवठा आणि ५00 पेक्षा कमी लोकसंख्येचे गाव हा प्रमुख निकष ठेवला गेला आहे. या निकषात बसणारी यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावे, तांडे, वाड्या, वस्त्या आहेत. परंतु त्यानंतरही यवतमाळ जिल्ह्याचा प्रकल्पात समावेश करण्यात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होते. या गावांचा कृती आराखड्यांमध्ये समावेश करून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात २८८ गावात संभाव्य पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे कृती आराखड्यात नमूद करण्यात आले. कित्येक गावात पाण्याचे स्रोत नाही, कुठे असले तर ते फ्लोराईडमुळे दूषित आहेत. नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागते. रखरखत्या उन्हात टँकरची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी, शेतमजूर व गोरगरिबांचा रोजगार बुडतो. पाणीटंचाईबाबत यवतमाळ जिल्ह्यात भीषण स्थिती असतानाही जलस्वराज्य प्रकल्पातून वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. याबाबत जिल्ह्यातील मंत्री-आमदारांना जाब विचारण्याची तयारी विविध संघटना व नागरिकांनी केली आहे. जलस्वराज्य टप्पा - २ मध्ये समाविष्ठ गावांना १६ जूनपर्यंत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मागितले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)