शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कळंब, यवतमाळ येथे प्राप्तिकर विभागाची धाड

By admin | Updated: March 2, 2017 00:48 IST

येथील नागपूर रोडस्थित एम.पी.वाईन शॉप आणि त्यांच्या यवतमाळातील घरावर मंगळवारी दुपारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाड घातली.

कळंब : येथील नागपूर रोडस्थित एम.पी.वाईन शॉप आणि त्यांच्या यवतमाळातील घरावर मंगळवारी दुपारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाड घातली. त्यात अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. मात्र वाईन शॉप मालकाने ही धाड नसून रूटीन तपासणी असल्याचे सांगितले. आयकर विभागाच्या पथकाने दुकानदाराच्या बँक खात्याची माहिती घेतली. विशेष म्हणजे यामध्ये नोटाबंदीच्या काळात करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केल्याची माहिती आहे. तसेच वाईन शॉपच्या व्यवहाराची माहिती घेत कागदपत्रांची तपासणी केली. या धाडीत पथकाला कोणते आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली, याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर पथकाने यवतमाळ येथील मनीष जयस्वाल यांच्या घरी असलेल्या कार्यालयात पोहोचून कागदपत्रांची माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान वाईन शॉपवर धाड पडल्याची माहिती मिळताच कळंब येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. यामध्ये हार्डवेअरची दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. तर काहींनी आयकर विभागाचे अधिकारी कळंब येथून निघून गेल्यानंतर दुकाने सुरु केली. या धाडीमुळे कळंब शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात वाईन शॉपचे संचालक मनीष जयस्वाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा सर्व प्रकार रुटीन असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी ज्या कागदपत्रांची मागणी केली, त्यानुसार त्यांना ती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. (तालुका प्रतिनिधी)