शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पूजाचा मोडलेला संसार शिक्षकाने सावरला

By admin | Updated: December 17, 2015 02:37 IST

पतीच्या आकस्मिक निधनामुळे मोडलेला पूजाचा संसार एका शिक्षकाने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा उभा राहिला.

किन्हीचा तरूण : तीनही कुटुंबातील सदस्य आणि मान्यवरांच्या साक्षीने झाला विवाहपांढरकवडा : पतीच्या आकस्मिक निधनामुळे मोडलेला पूजाचा संसार एका शिक्षकाने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा उभा राहिला. तीनही कुटुंबाच्या साक्षीने मंगळवारी केळापूर येथील जगदंबा मंदिरात अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडला. योगायोगाने का होईना जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, सूर्यकांत गाडे पाटील, डॉ. महानूर, साहेबराव पवार ही मंडळी या आदर्श विवाहाची साक्षीदार ठरली. घाटंजी तालुक्याच्या आकपुरी येथील पूजा या पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवतीचा विवाह आर्णी तालुक्याच्या आयता येथील मंगेश नामक शिक्षकाशी झाला. या दोघांच्या संसारवेलीवर अन्वीन नावाचे फुलही उमलले. त्यांचा संसार सुखात, आनंदात सुरू असताना मंगेशवर काळाने झडप घातली. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या संसाराचे एक चाक निखळले. पूजा आणि अन्वीन हे दोघेही पांढरकवडा येथे वास्तव्याला गेले. पूजाचा संसार पुन्हा उभा राहावा, यासाठी समाज आणि कुटुंबातील मंडळींनी पुढाकार घेतला. दरम्यान, घाटंजी तालुक्याच्या किन्ही येथील घनश्याम कचरे या शिक्षकापुढे पूजाशी विवाह करण्याचा प्रस्ताव त्याच्या नातेवाईकांनी ठेवला. युग निर्माण विजाभज प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या घनश्यामनेही या प्रस्तावाला हो भरला. अतिशय साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय पूजा आणि घनश्यामच्या नातेवाईकांनी घेतला. यासाठी केळापूर येथील जगदंबा संस्थान हे स्थळ निश्चित करण्यात आले. बुधवारी पूजा आणि घनश्यामचा विवाह पार पडला. यावेळी पूजा, मंगेश आणि घनश्याम या तिघांच्याही कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. जगदंबा मंदिर परिसरात आप्तस्वकीय आणि मित्र मंडळींच्या साक्षीने या दोघांचा हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. (शहर प्रतिनिधी)