शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

महिला बचत गटांचे दिवाळे

By admin | Updated: May 30, 2014 00:25 IST

कुपोषित बालकांना घरपोच पोषण आहार पोहोचविण्याचे कंत्राट महिला व बालविकास विभागांकडून १७ बचत गटांना देण्यात आले. यासाठी आवश्यक युनिटची उभारणी संबंधित बचत गटांनी केली.

जिल्हाधिकार्‍यांनी सीईओंचा निर्णय फिरविला : घरपोच पोषण आहार कंत्राटाच्या फेरनिविदा यवतमाळ : कुपोषित बालकांना घरपोच पोषण आहार पोहोचविण्याचे कंत्राट महिला व बालविकास विभागांकडून १७ बचत गटांना देण्यात आले. यासाठी आवश्यक युनिटची उभारणी संबंधित बचत गटांनी केली. मात्र हे कंत्राट सुरू होण्याअगोदरच फेरनिविदा काढण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. या निर्णयामुळे लाखोंची गुंतवणूक करणार्‍या महिला बचत गटांचे दिवाळे निघाले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत स्तनदा, गरोदर माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांनी तयार पोषण आहार पूरविण्याची योजना आहे. हे काम महिला बचत गटांना देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा दुहेरी उद्देश शासनाचा आहे. यासाठीच ८ ऑगस्ट २0१३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून बचत गटांची निवड करण्यात आली होती. यात यवतमाळ जिल्हय़ातील १७ बचत गटांची निवड झाली. पुरवठा करण्यासाठी पोषण आहार तयार करण्याचे युनिट संबंधित बचत गटांनी उभारले. यासाठी बॅंकांकडून १0 ते १५ लाखांचे कर्ज घेऊन मोठी गुंतवणूक केली. विशेष म्हणजे महिला व बालविकास आयुक्तांकडून या पोषण आहार युनिटची पाहणी करण्यात आली. नगरपरिषद मुख्याधिकारी यांनीसुद्धा पाहणी करून सकारात्मक अहवाल दिला. हे युनिट शासनाच्या अटी व शर्तीनुसारच उभारण्यात आले. आता पुरवठय़ाचे आदेश मिळणार, ही आशा बचत गटांच्या महिलांना लागली होती. यासोबतच पोषण आहाराचे कंत्राट घेणार्‍या औरंगाबाद, बिड, चंद्रपूर येथील बचत गटांनी पुरवठय़ाचे काम सुरू केले आहे. यवतमाळ जिल्हय़ासाठी मात्र फेरनिविदा बोलविण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. या आदेशामुळे लाखोंची गुंतवणूक करणारे महिला बचत गट पुरते हादरून गेले आहे. कर्जाऊ रक्कम घेऊन भाड्याच्या जागेत युनिट उभारले आहे. एक रुपयाचेही उत्पादन न होता महिन्याकाठी हजारो रुपये वीज बिल भरावे लागत आहे. अशा स्थितीत शासनाने आपला आदेश फिरविल्याने बचत गटातील सदस्य महिलांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ऐपत नसतानाही केवळ शासनाने दिलेल्या आदेशावरून पुरवठय़ाचे कंत्राट घेतले आहे. आता नव्याने निविदा काढल्यामुळे बचत गटांच्या महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. एकाच पुरवठय़ासाठी युनिट उभारण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. त्यावरून या बचत गटाच्या महिलांनी शासन निकषानुसार युनिट तयार केले आहे. आता या बचत गटांना फेरनिविदा प्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे फेरनिविदेचा निर्णय देणारे जिल्हाधिकारी आजपर्यंत झालेल्या एकाही बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतरही त्यांनी बचत गटांच्या महिलांची बाजू ऐकून न घेता पुन्हा निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे सांगितले. या संदर्भात ज्योती तामगाडगे, पुष्पा राऊत, वैशाली गजघाटे, लक्ष्मी सातपुते, हिरा वासनिक, गीता पाटील,  माधुरी ढेपे, सीमा रामटेके, कमला राऊत, सुरेखा नरवाडे, प्रभा चवरे, निलीमा भन्सारे, कुसुम गणवीर आदींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)