शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

वेळाबाईच्या महिलांचे आंदोलन

By admin | Updated: June 14, 2014 23:51 IST

वणी तालुक्यातील वेळाबाई येथील महिलांनी वाईनबारच्या विरोधासाठी शुक्रवारी दुपारी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. पोलिसांना पाचारण करून हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.

वाईनबारला विरोध : सुनावणीसाठी मिळाली तारीखयवतमाळ : वणी तालुक्यातील वेळाबाई येथील महिलांनी वाईनबारच्या विरोधासाठी शुक्रवारी दुपारी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. पोलिसांना पाचारण करून हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. महिलांचा रोष पाहता त्यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले. वेळाबाई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता परस्परच ग्रामसभेचा बनावट ठराव घेऊन तेथे वाईनबार सुरू करण्याला परवानगी दिली. हा प्रकार माहीत झाल्यानंतर गावातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी निवेदन दिले. मात्र यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पुन्हा आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रितसर परवानगी मागितली. मात्र त्यांना तब्बल एक तास उशिराची वेळ देण्यात आली. महिलांनी थेट कक्षात प्रवेश घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गावात बिअरबारच्या परवानगी संदर्भात मतदान केव्हा घेता, हे सांगा अशी विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारितील असल्याचे सांगून तेथे जाण्याचा सल्ला दिला. यावर महिलांनी तुम्ही असे स्टॅम्प पेपरवर लिहून देता का, असा सवाल केला. त्यानंतर संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. निर्णय मिळत नाही तोपर्यंत महिलांनी कक्षासमोरच ठिय्या मारला. हा आक्रमक पवित्रा पाहता तेथे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या दरवाजाने प्रस्थान केले. पोलिसांनी महिलांना कक्षाबाहेर काढले. सहायक पोलीस निरीक्षक माळवे यांनी महिलांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेवटी या महिलांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदान घेण्याची मागणी केली. अर्जावर असलेल्या महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यासाठी १८ जूनची तारीख दिली. त्यानंतर या महिलाांनी आपले आंदोलन मागे घेतले. बिअरबारला सनदशीर मार्गानेच विरोध करणार असल्याचेही या महिलांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता राजूरकर, ग्रामपंचायत सदस्य मंदा झाडे, विकास शेडामे, आनंदाबाई काकडे, गीता काकडे आदी महिला उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)