शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

सूरजनगरमध्ये महिलेचा खून

By admin | Updated: May 29, 2017 00:24 IST

येथील सूरजनगरमध्ये महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. सदर महिलेच्या

चोरीचा बनाव : रात्रीची घटना, रविवारी दुपारी आली उघडकीस लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील सूरजनगरमध्ये महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. सदर महिलेच्या डोक्यावर प्रहार करून खून करण्यात आला. नंतर घरातील दोन कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. या खुनाला चोरीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाल्याचे यावरून दिसून येत आहे. पपिता निलध्वज कांबळे (३३) रा. सूरजनगर, असे मृत महिलेचे नाव आहे. पपिता कांबळे यांचे पती निलध्वज हे आदर्श विद्यालय डोंगरखर्डा येथे शिक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते मुलासह नागपूर येथे लग्नासाठी गेले होते. दरम्यान पपिता घरी एकट्याच होत्या. रविवारी दुपारी पपिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ््यात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले असता, पपिताचा बेडरूममध्ये डोक्यावर जोरदार प्रहार करून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. हा खून शनिवारी रात्री किंवा त्यापूर्वी झाला असावा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी भेट दिली. विविध पथकातील कर्मचारी व वडगाव रोडचे नवनियुक्त ठाणेदार बाळासाहेब खाडे घटनास्थळावर उपस्थित होते. ठसे तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक विभागाची मोबाईल व्हॅनही येथे दाखल झाली. कांबळे यांच्या घराचा पुढचा दरवाजा उघडा होता. यावरून ही घटना चोरीसाठी झालेली नसावी, असा अंदाज लावला जात आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ दोन मोबाईल पडून होते. पपिता या निलध्वज यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व पपितापासून दुसरा मुलगा आहे. निलध्वज मुलाला घेऊन नागपूर येथे लग्नाला गेल्यानंतर ही घटना घडली. नेमका खून कशातून झाला याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. ठाणेदार रूजू होताच तपासाचे आव्हान वडगाव रोड पोलीस ठाण्याला काही आठवड्यापासून नियमित ठाणेदार नव्हते. रविवारी दुपारीच बाळासाहेब खाडे पदभार स्विकारण्यासाठी आले असता त्यांना थेट खुनाच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जावे लागले. नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच खुनाच्या तपासाने ठाणेदार खाडे यांच्या कामाची सुरूवात झाली.