शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांशिवाय भूमिपूजन नाही

By admin | Updated: May 18, 2016 02:41 IST

दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उपस्थित असल्याशिवाय होणार नाही,

शिवसेनेचा फतवा : अन्य पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांची होतेय कोंडी यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उपस्थित असल्याशिवाय होणार नाही, असा मौखिक फतवाच शिवसेनेने अधिकाऱ्यांसाठी काढला आहे. कोणत्याही लहान-मोठ्या विकास कामावर सेनेचे पदाधिकारीच कुदळ मारत असल्याने जिल्ह्यातील अन्य राजकीय पक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती सुभाष ठोकळ यांनी तीव्र नाराजी बोलून दाखविली आहे. जलयुुक्त शिवार, पाणलोट, रोजगार हमी योजनेतील कामे, तांडावस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, जनसुविधेची कामे, स्मशानभुमी शेड, जिल्हा परिषद फंडातील रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, नळयोजनांची दुरूस्ती अशा विविध स्वरूपांच्या योजनांचे भूमिपूजन पालकमंत्र्याच्या उपस्थित करावे असा असा मौखिक आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. या कामांच्या गावाची यादीच प्रसिध्द केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या लाडखेड, बोरी, डोल्हारी, लोही सर्कलमध्ये येणाऱ्या गावांचा समावेश आहे. १६, १७ आणि १८ मे रोजी भूमिपूजन आयोजित होते. त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद सदस्यांची गच्छंती करण्यासाठी पालकमंत्री अधिकार वापरत असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या नियमित योजनेतील कामांचे भूमिपूजन करण्याऐवजी निधी, प्रकल्प याची तरतूद करून मोठे भूमिपूजन करावे, असा सुर जिल्हा परिषद सदस्यांत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही पालकमंत्र्यांचा आग्रह कशासाठी ? - सुभाष ठोकळ जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बांधकाम सभापती सुभाष ठोकळ ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले,पालकमंत्र्यानी रस्ता दुरूस्तीसारख्या कामाच्या भूमिपूजनासाठी आग्रह धरावा हे आश्चर्यकारक आहे. सत्तेत असून विकास कामांसाठी अतिरिक्त निधी खेचण्याऐवजी नियोजित योजनांचे भूमिपूजन शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. लाडखेड सर्कलमध्ये दर्यापूर येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पालकमंत्र्याचे नाव सांगून सेना पदाधिकारी पंडीत राठोड आणि सुधीर दातीर यांनी केले. हा प्रकार चुकीचा आहे. जिल्हा परिषद सदस्यांने काम आल्यानंतर कुरघोडी करणे योग्य नसल्याचेही ठोकळ म्हणाले.