शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रेशन माफियाचे साम्राज्य मोडीत काढण्याचे धाडस जिल्हा पुरवठा विभाग दाखविणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

आर्णी येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तीन सलग कारवाया सुमारे १६०० पोती रेशनचा गहू जप्त केला होता. मात्र, या तस्करीची लिंक पुढे उघड झाली नाही. पुरवठा विभागाकडून सकारात्मक अहवाल न मिळाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. आता 'लोकमत'च्या वृत्तमालिकेनंतर प्रशासनाचे या माफियाच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. हे साम्राज्य ठोस कारवाई करून मोडीत काढणार का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काळ्या बाजारात धान्य विकणाऱ्या माफियांनी जिल्ह्यातील रेशन दुकानेच ताब्यात घेतली असून परवानाधारक दुकानदार केवळ नामधारी उरलेले आहेत. रेशनमाफियाच्या या कारनाम्याबाबत 'लोकमत'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कळंब येथून १६ लाखांच्या धान्यासह दोन ट्रक जप्त करीत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात धान्य माफिया काल्याचाही समावेश आहे. मात्र, केवळ एवढ्या कारवाईवर न थांबता प्रशासन जिल्ह्यातील रेशन माफियाचे हे साम्राज्य मोडीत काढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील १५ वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात शासकीय धान्याचा काळा बाजार करणारे रॅकेट कार्यरत आहे. दिग्रस, आर्णीसह यवतमाळमधून धान्य गोळा करणारी विंग आहे. दुसरीकडे रेशन दुकानदारांच्या गोदामातून धान्याची उचल करणारी स्वतंत्र यंत्रणा माफियाने उभारली आहे. यासाठी दहा ते बारा वाहनांचा ताफाही या माफियाकडे आहे. पंटरकडून जमा केलेल्या या धान्यावर घातक रसायनांचा प्रयोग करून त्याला चांगल्या प्रतीच्या धान्यात भेसळ करण्यासाठी वापरले जाते. यातून मोठी आर्थिक रसद रेशन माफियाला मिळत आहे. वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा कारभार चालविला जात आहे. गुरुवारी ज्या धान्य माफियावर कारवाई करीत तांदूळ आणि गहू जप्त करण्यात आला आहे, त्याच धान्य माफियाचा २०१८ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कळंब येथे २०० पोती तांदूळ जप्त केला होता. यावेळी या माफियाचे अवैध गोडाऊनही नष्ट केले होते. मात्र, गुरुवारच्या कारवाईनंतर या माफियाचे कारनामे बिनबोभाट सुरूच होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धान्य माफिया काल्याचा भुरटा चोर ते रेशन माफिया हा प्रवास पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांना धरून सुरू असल्याचे दिसते. आर्णी येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तीन सलग कारवाया सुमारे १६०० पोती रेशनचा गहू जप्त केला होता. मात्र, या तस्करीची लिंक पुढे उघड झाली नाही. पुरवठा विभागाकडून सकारात्मक अहवाल न मिळाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. आता 'लोकमत'च्या वृत्तमालिकेनंतर प्रशासनाचे या माफियाच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. हे साम्राज्य ठोस कारवाई करून मोडीत काढणार का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

त्या सात दुकानदारांचे निलंबन पुरवठा विभाग करणार कधी ? 

- यवतमाळमधील सात परवानाधारकांनी तपासणीला सहकार्य केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र वस्तू अधिनियम १९७५ नुसार कारवाई प्रस्तावित आहे. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी डीएसओंकडे २८ जूनला अहवाल दिला. त्यावर पुरवठा विभागाने तब्बल दीड महिना केवळ सुनावणीमध्ये घालविला. हा विषयही ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर आता पुरवठा निरीक्षकांनी संबंधित दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. या बाबतची कारवाई पुरवठा विभाग करणार कधी?.

 

टॅग्स :mafiaमाफिया