शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या धावंडाला जलपर्णीचा विळखा

By admin | Updated: June 2, 2014 01:51 IST

शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या आणि महापुरात १९ जणांचा बळी घेणार्‍या धावंडा

दिग्रस : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या आणि महापुरात १९ जणांचा बळी घेणार्‍या धावंडा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीपात्र हिरवेगार झाले असून पावसाळा तोंडावर आला तरी स्वच्छतेबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. परिणामी यावर्षीच्या पावसाळ्यातही नदी तीरावरील घरांना पुराचा धोका संभवतो.

दिग्रस शहरातून धावंडा नदी वाहते. शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रात जलपर्णी आणि बेशरम वाढली आहे. जलपर्णीच्या विळख्याने नदीचे पात्र हिरवेगार झाले आहे. धावंडा नदीच्या पात्रात शहरातील गटाराचे पाणीही येते. त्यामुळे नदीत पूर्ण घाण पाणी साचले आहे. उन्हाळ्यात साचलेल्या डबक्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तसेच नदी तीरावर आणि पात्रातही मोठय़ा प्रमाणात बेशरमचे झुडूपे वाढली आहे. प्रशासनाने अद्यापपर्यंत नदी स्वच्छतेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. पावसाळ्यात थोडाजर पाऊस झाला तरी धावंडा नदीला पूर येतो. बेशरम आणि जलपर्णीमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी नदी तीरावरील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते.

नांदगव्हाण धरण फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. या महापुरात १९ जणांचे बळी गेले. अर्धे शहर जलमय झाले होते. त्यानंतर पुनर्वसनासह विविध कामे सूचविण्यात आली. मात्र पुनर्वसनाचेही घोडे अडले आहे. आता पावसाळा तोंडावरच आला आहे. मात्र अद्यापही नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पावसाळा आला की नदी तीरावरील नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. अन्यथा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)