शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वसाहतीमधील विहिरी ‘मौत का कुआँ’

By admin | Updated: May 13, 2017 00:25 IST

शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत.

मृतदेहांमुळे पिण्याच्या पाण्याचे वांदे : कठडे बसविण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत. त्यामुळे विहिरीत पडून प्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत. लोहारा परिसरात तर चक्क खुनातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अशा विहिरीचा वापर करण्यात आला. त्यामुळे ‘मौत का कुआं’ ठरत असलेल्या या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. लोहारा, उमरसरा, भोसा, पिंपळगाव आदी परिसरातील खुल्या भूखंडांवर अनेक विहिरी आहेत. ले-आऊट पडण्यापूर्वी असलेल्या यातील बहुतांश विहिरी आजही बेवारस स्थितीत आहेत. काहींना भरपूर पाणी आहे, तर काही कोरड्याठाक आहेत. मात्र या दोन्ही प्रकारच्या विहिरी जिवितहानीसाठी निमंत्रण ठरत आहेत. अनेक विहिरी भूपृष्ठाशी समतल आहेत. त्याच बाजूने ‘ओपन स्पेस’ असल्याने बहुतांश नव्या वसाहतींमधील मुले अशा विहिरींच्या आसपास खेळताना दिसतात. मोकाट जनावरे विहिरीत पडून दगावण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. भोसा परिसरातील विहिरीत डुक्कर पडून दगावल्याची घटना ताजी आहे. ते डुक्कर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. लोहाराच्या सानेगुरुजी नगरातील विहिरींमध्ये तर चार महिन्यांच्या कालावधीत दोन मानवी मृतदेहच सापडले. लोहारातील तरुणाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याला अर्धवट जाळण्यात आले आणि विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीतून आरोपींनी हा मृतदेह विहिरीत आणून टाकला. विशेष म्हणजे, याच विहिरीतून पाच ते सहा घरांमध्ये पिण्याचे पाणी वापरले जाते. मृतदेह विहिरीत असताना तब्बल दोन दिवस नागरिकांनी पाणी पिले. घटना उघडकीस आल्यावर त्यांच्या मनावर काय बेतली, याची काळजी प्रशासनाने केली नाही. याच भागातील दुसऱ्या एका विहिरीत लोहाऱ्यातीलच एका अल्पवयीन मुलाने रात्रीदरम्यान आत्महत्या केली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत विहिरीतच होता. सानेगुरुजी नगराच्या प्रवेशद्वारातच अत्यंत मोठ्या गाल्याची विहिरी कठड्याविना आहे. भरपूर पाणी असलेल्या या विहिरीतही दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होण्याची शक्यता आहे. नव्या वसाहतींमधील मोकळ्या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची मागणी आहे. बोअरवेल खुल्याच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नव्या वसाहतींमध्ये भरमसाठ बोअरवेल केल्या जात आहेत. मात्र, त्यातील मोजक्याच बोअरवेलला पाणी लागत असून इतर व्यर्थ ठरत आहे. मात्र एकदा खोदलेली ही बोअरवेल बुजविण्याचे कष्ट कोणीही घेताना दिसत नाही. अशा बोअरवेलचे तोंड बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.