शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने होरपळतेय जनता

By admin | Updated: August 24, 2014 23:47 IST

येथील ३३ के़व्ही़ क्षमतेच्या उपकेंद्रांतर्गत १० तासांचे भारनियमन होत असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अत्यल्प पावसामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने ग्राहकांना

घोन्सा : येथील ३३ के़व्ही़ क्षमतेच्या उपकेंद्रांतर्गत १० तासांचे भारनियमन होत असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अत्यल्प पावसामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने ग्राहकांना भारनियमनाचा चटका बसत आहे. दिवसभर लघु व्यवसाय ठप्प राहात असल्याने लघु व्यावसायीकांवर संक्रांत ओढवली आहे. येथे महावितरणचे ३३ के़व्ही़ क्षमतेचे उपकेंद्र आहे़ या उपकेंद्रांतर्गत तीन फीडर येतात. त्यामध्ये साखरा, खडकडोह आणि सुसरी पेंढरी येथील फिडरचा समावेश आहे. या तीन फिडरअंतर्गत परिसरातील ३८ ते ४० गावे येतात़ मात्र या सर्व गावांना १० तासांच्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे़ महावितरणची गावठाण फीडर योजना अजूनपर्यंत कार्यान्वित न झाल्याने या भारनियमनामध्ये कोणताही बदल झालेला नाही़ तसेच ज्या गावांमध्ये ही गावठाण फिडरची योजना कार्यान्वित करण्यात आली, तेथे सुध्दा भारनियमन केले जात आहे. त्यामुळे गावठाण फीडर योजनेचा लाभ तरी काय, असा प्रश्न वीज ग्राहकांना प्रश्न पडत आहे़सध्या भारनियमनाची वेळ सकाळी ६ ते दुपारी २ वाजतापर्यंत आहे. परिणामी दिवसभर वीज नसते. त्यातच यावर्षी अद्याप अपुरा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला. सूर्य चांगलाच तापत आहे. तापणाऱ्या उन्हामुळे ग्रामस्थांचा जीव होरपळून निघत आहे़ कोरड्या वातावरणामुळे लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़घोन्सा येथील वीज उपकेंद्र अनेक समस्यांचे माहेरघरच बनले आहे़ येथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सोयीसुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनातसुध्दा महावितरणप्रती प्रचंड चिड निर्माण झाली आहे़ त्यातच भारनियमन सलग असल्याने त्याचा मोठा फटका सर्वांनाच बसत आहे़ हे भारनियमन दोन टप्प्यात घेण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. महावितरणने याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)