शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना बारगळली

By admin | Updated: August 1, 2016 00:57 IST

विहीत कालावधी उलटून गेल्यावरही पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपरिषदेने सुरू केले नाही. त्यामुळे उर्वरित अनुदान देणे शक्य नाही.

आर्णी पालिकेला नोटीस : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मागितला खुलासा आर्णी : विहीत कालावधी उलटून गेल्यावरही पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपरिषदेने सुरू केले नाही. त्यामुळे उर्वरित अनुदान देणे शक्य नाही. आता ही पाणीपुरवठा योजनाच रद्द का करण्यात येवू नये, अशी नोटीस नगरपरिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाठवून खुलासा मागितला आहे. या नोटीसमुळे आर्णीतील महत्त्वाकांक्षी योजना बारगळल्याचे बोलले जात आहे. आर्णी शहरासाठी महाराष्ट्र सुजल निर्माण अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या भांडवली कामातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. १२ डिसेंबर २०१३ च्या आदेशानुसार ४१ कोटी ८१ लाख ४० हजार इतक्या रकमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयातील प्रशासकीय मान्यतेच्या आदेशानुसार तीन महिन्यात कामे सुरू न केल्यास सदर पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता आपोआप रद्द होईल, अशी अट नमूद आहे. सदर अटीनुसार पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने आर्णी नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक होते. नगरपरिषदेला एकूण अनुदानापैकी नऊ कोटी इतक्या रकमेचा पहिला हप्ताही शासनाकडून २२ मे २०१५ च्या आदेशानुसार अदा करण्यात आला आहे. तरीसुद्धा अडीच वर्षाचा कालावधी लोटल्यावरही नगरपरिषदेने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे आपल्या नागरी संस्थेस उर्वरित अनुदान अदा करणे शक्य होणार नाही. नागरी क्षेत्रात विविध योजनेखाली पाणीपुरवठ्याबाबतच्या योजना आता नगरोत्थान महाअभियान, अमृत योजना यासारख्या योजनांमार्फत नगरविकास विभागाकडून राबविण्यात येत आहे. तसेच त्या विभागाने मंजूर केलेल्या योजनेनुसार महाराष्ट्र सुजल निर्माण अभियानांतर्गत आपल्या नागरी संस्थेस २२ मे २०१५ च्या निर्णयानुसार वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाचे समायोजन करता येईल. ही परिस्थिती विचारात घेता आपल्या नागरी संस्थेस मंजूर करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना रद्द का करण्यात येवू नये, या बाबत शासनाकडे तत्काळ खुलासा करण्यात यावा, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांना २८ जुलै रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव प्रमोद कानडे यांनी पाठविले आहे. या पत्रामुळे आर्णी नगरपरिषदेचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. योजना मंजूर झाली. काही प्रमाणात निधीही मिळाला. परंतु काम कोणी करावे, खासगी कंत्राटदार की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या भानगडीत योजनेची वाट लागली. सदर योजनेत कोर्टकचेरी सुरू झाली. यातही बराच वेळ निघून गेला. आता केवळ नऊ कोटींवरच समाधान मानावे लागणार आहे. आर्णी नगरपरिषदेचे ३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर योजना पूर्णत्वास जाणार की नाही, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी) अखेर ५० हजार लोकसंख्येचा प्रश्न कायमच आर्णी शहरात दोन जुन्या पाण्याच्या टाक्या आहे. इतर भागात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र ही व्यवस्था ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरासाठी पुरेश्ी नाही. शहराची वाढत असलेली व्याप्ती पाहता नवी पाणीपुरवठा योजना अत्यंत आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उन्हाळ्यात प्रचंड पाणीटंचाई जाणवली. टँकरची मलमपट्टीदेखील अपुरी ठरली. ४२ कोटी रुपयांच्या योजनेतून आर्णीकरांना दिलासा मिळणार होता. मात्र नाना प्रकारच्या भानगडींमुळे ही योजना बारगळून ५० हजार लोकसंख्येची तहान भागविणे अशक्य होणार आहे. योजना मार्गी लावण्यात अपयश तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी शहरासाठी ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली होती. ही योजना मार्गी लागावी, अशी त्यांची धडपड होती. आर्णी नगरपरिषदेत तेव्हा काँग्रेसचीच सत्ता होती. आजही नगरपरिषदेत काँग्रेसकडेच सत्ता आहे. तरीही आपल्या मंत्र्याने खेचून आणलेली योजना पूर्णत्वास नेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक शिलेदार अपयशी ठरले आहे. त्यामुळे शिवाजीराव मोघे यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले, अशी चर्चा आता आर्णीकरांमध्ये सुरू झाली आहे.