शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा तीरावर पाणी पेटले

By admin | Updated: March 30, 2017 00:06 IST

विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीत सोडलेले पाणी अडविल्यावरून विदर्भ आणि मराठवाडा असा संघर्ष पेटला.

महसूल विभागानेच बांध फोडला : दोन्ही तीरावरील नागरिक आमने-सामने उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीत सोडलेले पाणी अडविल्यावरून विदर्भ आणि मराठवाडा असा संघर्ष पेटला. पैनगंगेच्या पात्रात बांधलेला बंधारा उमरखेड महसूलने फोडल्याने मराठवाड्यातील नागरिकांनी जोरदार दगडफेक केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. गत काही महिन्यांपासून पैनगंगा कोरडी पडली आहे. त्यामुळे ५० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यात तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट पिंपरी, बारा, बेलखेड, चिंचोली, बिटरगाव, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, राजापूर, वांगी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, दिघडी, देवसरी, कारखेड, उंचवडद, चातारी, बोरी, करंजी, शिंदगी, गांजेगाव, ढाणकी, सोईट, सावळेश्वर, करंजी, भोजनगर, पिंपळगाव, जेवली, मुरली, लिंगी, सोनदाबी, करोटी, जवराळा, थेरडी आदी गावांचा समावेश आहे. या गावातील नळयोजना बंद पडल्या असून नागरिकांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इसापूर धरणातील पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत होते. यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, प्रशासनाने याची दखल घेत ६ मार्च रोजी १० दलघमी पाणी इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले. परंतु कोंडा गावाजवळ पळसपूरसह इतर मराठवाड्यातील गावकऱ्यांनी २० फुटांचा अनधिकृत बंधारा बांधला. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह खोळंबला. परिणामी खालच्या भागाला असलेल्या गावात पाणीटंचाई कायम होती. शेवटी या भागातील नागरिकांनी तहसीलदार भगवान कांबळे यांना ही माहिती दिली. त्यावरून महसूलचे पथक तत्काळ बंधाऱ्यावर पोहोचले. जेसीबीने बांध फोडण्यास सुरुवात केली, त्यावेळी मराठवाड्यातील नागरिकांनी या पथकावर दगडफेक केली. दोन्हीकडील नागरिक आमने-सामने आले. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी पोलीस ताफा पाठविला. तब्बल दोन तास दोन्ही तीरांवरील नागरिकांत शाब्दिक वाद सुरू होता. महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अखेर हा बंधारा फोडून पाणी प्रवाहीत केले. या घटनेने भविष्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहे. (शहर प्रतिनिधी)