शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीची आयुष्य मर्यादा संपली

By admin | Updated: August 24, 2014 23:46 IST

शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ

रूपेश उत्तरवार - यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ बदलविण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. यातून शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरात १९७२ मध्ये जलवाहिनीचे जाळे विणण्यात आले. त्यावेळी पीव्हीसी आणि सिमेंट पाईपचा वापर करण्यात आला. या जलवाहिनीची आयुष्य मर्यादा ३० वर्षे असून ती २००२ मध्येच संपली. यानंतर तब्बल १२ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र जीर्ण पाईप लाईन बदलविली नाही. नवीन पाईप लाईनसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठीचा प्रस्ताव प्राधिकरणाने राज्य शासनाकडे पाठविला. मात्र या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. तब्बल १२ वर्षानंतरही हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने जलवाहिनीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. काही भागात नालीच्या खालच्या भागात पाईप लाईन आहे. नाली फुटल्याने तेथे पाईप लाईन लिक झाल्याची गंभीर बाब शहरात उघड झाली आहे. यातून जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात २९ हजार ३१३ नळजोडण्या आहेत. या माध्यमातून दोन लाख ७५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. ३५० किलोमीटर जलवाहिनीचा विस्तार आहे. यासाठी बिड आणि लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आला आहे. बिडच्या पाईपची आयुष्यमर्यादा ६० वर्षांची तर लोखंडी पाईपची आयुष्य मर्यादा १०० वर्षांची आहे. पाईप लाईनचा विस्तार करताना लोखंडी पाईप आणि बिडच्या पाईपचा वापर करण्यात आला आहे. अशीच जलवाहिनी इतर भागात अपेक्षित आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. एका पाण्याच्या टाकीवरून दोन किमी अंतरापर्यंत चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा करता येतो. पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. मात्र सध्याच्या स्थितीत जुनी पाईप लाईन आहे. त्याचा आकारही लहान आहे. यावरच नवीन नळजोडण्या लावण्यात आल्या आहे. त्यातच एका टाकीवरून १२ किमी अंतरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही भागात पुरेसे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या टाक्या उभारण्याची आवश्यकता आहे. तीन नवीन टाक्यांचा प्रस्ताव प्राधिकरणाने दिला आहे. त्यावर अजूनही विचार झालेला नाही. शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी दर दिवसाला ३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवशकता आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे २७ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जलवाहिनीचा दाबाचे एक सूत्र निश्चित करण्यात आले आहे. एका मिनिटाला १२ लिटर पाणी जमा होणे अपेक्षित आहे. मात्र मर्यादित जलवाहिनीवर अतिरिक्त भार असल्याने हे सूत्र जुळतच नाही. परिणामी नागरिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नसल्याचे सांगितले जाते.