शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वखार महामंडळाच्या गोदामाला आग

By admin | Updated: May 18, 2016 02:37 IST

येथील धामणगाव मार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामात संरक्षित सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

मोठा अनर्थ टळला : संरक्षित रसायनाच्या सिलिंडरचा स्फोटयवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामात संरक्षित सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आल्याने मोठा अनर्थ टळला. येथील धामणगाव मार्गावर वखार महामंडळाचे गोदाम आहे. या गोदामात धान्याचे पोते ठेवण्यात आले आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास धान्याच्या सुरक्षेसाठी संरक्षित रसायन फवारले जात होते. यावेळी रसायनाच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे गोदामात आग भडकली. हा प्रकार लक्षात येताच गोदामातील फायर फायटरने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला. तसेच नगर परिषदेच्या अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आली. आगीवर कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेळीच नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे या गोदामातील तांदूळाचे एक हजार पोते वाचविण्यात आले.आग लागताच तेथील कर्मचाऱ्यांनी तांदुळाचे पोते हमालांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच आगीवरही नियंत्रण मिळविणे सुरू केले. पाण्याचा मारा झाल्याने तांदळाचे अनेक पोतेही ओले झाले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे दिलीप बोपचे, शहेबाज खान, निलेश चव्हाण यांच्यासह वखार महामंडळाचे केवलेश राठोड, सतेंद्र सिंग यांनी परिश्रम घेतले. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. आधीच तापमान ४४ अंशाच्यावर पोहोचले असून अशा परिस्थितीत लागलेली आग नियंत्रणात आल्याने वखार महामंडळाचे मोठे नुकसान टळले. (शहर वार्ताहर)