शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडात वादळी पावसाचे तांडव

By admin | Updated: May 28, 2017 00:54 IST

रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने शनिवारी सायंकाळी सर्वांचीच दाणादाण उडविली. सुसाट वादळासह आलेल्या या मुसळधार पावसाने

घरांवरील छपरे उडाली : राजूरजवळ आॅटोरिक्षा उलटला, वणी विश्रामगृहाचे छत उडाले, लाखोंचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क वणी : रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने शनिवारी सायंकाळी सर्वांचीच दाणादाण उडविली. सुसाट वादळासह आलेल्या या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरावरील छपरे उडवून नेली. वणीच्या विश्रामगृहावरील चारही खोल्यांवरची छपरे वादळाने उडून गेली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. राजूर फाट्यावर एक आॅटो उलटला. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. त्यामुळे वणी शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. या वादळामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शनिवारी सायंकाळी अचानक आभाळात ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता, की या वादळादरम्यान राजूर फाट्यावर वणीकडे येणारा एक मालवाहू आॅटो उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वणी पोलीस ठाण्यातील दक्षता भवनाच्या इमारतीवर असलेले सोलर यंत्रणा खाली कोसळली. ही यंत्रणा इमारतीच्या सज्जावर कोसळल्याने सज्जाही वाकला. त्याखाली उभ्या असलेल्या दोन दुचाकींचाही यात चुराडा झाला. वणीच्या विश्रामगृहातील व्हिआयपी खोली, दोन अन्य खोल्या व भोजन कक्षावरील छप्पर उडून मागील बाजूस कोसळले. या परिसरातील एक झाडही उन्मळून पडले. वणी ग्रामीण रूग्णालयातील ट्रामा केअर रूग्णालयात मजुरांसाठी बांधण्यात आलेले टिनाचे शेड उडून गेले. वणी बसस्थानक परिसरातील दोन मोठे जाहिरातींचे फलकही कोसळले. शहरातील काही भागात विजेचे खांब वाकले. काही ठिकाणी तारा तुटल्या. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यातही वादळाने तांडव घातले. यात मोठे नुकसान झाले. वीज पुरवठ्यातील त्रुट्या दूर करण्याचे काम सुरू वादळ सुरू होताच वणी शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास तासभर या वादळी पावसाने तांडव घातले. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज वितरणातील त्रुट्या दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती वीज वितरणचे अभियंता झाडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. रात्री ८ वाजतानंतरही अनेक भागातील वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. पाऊस येऊन गेल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.