शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वणीत कापूस पोहोचला ५७०० रूपयांवर

By admin | Updated: January 22, 2017 00:06 IST

सरकीच्या दरातील तेजीने कापसाचे दर वधारले. लांब धाग्याच्या कापसाला वणीत ५७०० रूपये, तर यवतमाळात ५५३० रूपये क्विंटलचा दर मिळाला.

यवतमाळात ५५३० चा दर : १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी यवतमाळ : सरकीच्या दरातील तेजीने कापसाचे दर वधारले. लांब धाग्याच्या कापसाला वणीत ५७०० रूपये, तर यवतमाळात ५५३० रूपये क्विंटलचा दर मिळाला. जिल्ह्यात २० जानेवारीपर्यंत १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. दरात होणाऱ्या सुधारामुळे बाजारपेठेत कापसाची आवक वाढत आहे. दरातही सुधारणा होत आहे. लांब, मध्यम आणि आखूड धाग्याच्या कापसानुसार दरात वर्गीकरण करण्यात येते. लांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक मागणी व दर आहे. वणी व मारेगाव परिसरात असा कापूस उपलब्ध असल्याने, तेथील बाजारपेठेत कापसाचे दर सर्वाधिक आहे. तेथे ५६०० ते ५७०० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे. हा दर इतर ठिकाणी मिळत नाही. यवतमाळ बाजार समितीसह इतर बाजार समितीत ५५०० रूपये क्विंटलचा दर आहे. यवतमाळात गत आठवड्यात कापसाचे दर ५४५० रूपये क्विंटलच्या घरात होते. शनिवारी २१ जानेवारीला कापसाचे दर ५५३० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये ८० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. (शहर वार्र्ताहर) सहा हजारांची प्रतीक्षा कापसाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे कापसाचे दर ६००० रूपये क्विंटलचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे. या दराच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. तर व्यापारी ६००० रूपये क्विंटलच्या दराबाबत ठामपणे बोलणे टाळत आहेत.