शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:32 IST

सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.

ठळक मुद्देप्रीती काबरा : सुरक्षित मातृत्व व सुदृढ बाळ हेच ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.गर्भवतीने कुठला आहार घ्यावा, उपचार आणि काय दक्षता घ्यावी याविषयी डॉ. काबरा यांनी माहिती दिली. गरोदरपणात पहिले चार महिने बाळ आकार घेते. याच काळात गर्भवतीला उलटी, मळमळ सुरू होण्यासोबतच अन्नाची वासना उडते. याच कारणाने बहुतेक गर्भवती माता महत्त्वाचे व्हिटॅमिन घेणे टाळतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही. गर्भवतीमध्ये बीपी, झटके, कमी दिवसात प्रसूती, गर्भजल कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. गर्भस्थ शिशु कमी वजनाचे, त्याचे हाड विशेषत: लांब हाडांची उंची खुंटते, मेंदू व हृदयाचे विकार होते. प्रसूतीनंतर स्पेशल केअर युनीटला बाळ भरती करावे लागते.या सर्व बाबी टाळण्यासाठी गर्भवतीने जेवण दर दोन-तीन तासांनी घेणे, सकाळी उठल्याबरोबर भाकरी खाणे, शक्यतो तिखट, अती आंबट, तळलेले पदार्थ, ठेचा खाणे टाळणे गरजेचे आहे. सायंकाळी दूध पोळी, मुगाची खिचडी, पातळ सोजी आणि रात्री झोपताना एक बिस्कीट किंवा टोस्ट घेतल्यास उलटी, मळमळ कमी होते. पुढील पाच महिन्यात आयर्न, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक लिटर चांगल्या दुधात एक ग्रॅम कॅल्शियम असते. कुठलीही गर्भवती दीड ते दोन लिटर दूध घेऊ शकत नाही आणि पचवू शकत नाही. म्हणून सोबत दिवसातून दोनवेळा कॅल्शियमची गोळी घेणे गरजेचे आहे. टाळल्यास शरीराच्या हाडातील कॅल्शियमचा ºहास होऊन कंबर, हात-पायदुखी वाढते, बीपीचा त्रास सुरू होतो.व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा घटक व्यवस्थित असल्यास कॅल्शियम व फॉस्फोरसची पातळी व्यवस्थित राहते. गर्भवती मातेची बीपी, बाळाची वाढ व्यवस्थित होते. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ आणि मातेला झटके येण्याचा प्रकार कमी असतो. या औषधी गर्भवतीने बाळाची गरज समजून घेतल्यास ऐन प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासणार नाही. सुरक्षित माता व सुदृढ बाळ हेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे ध्येय आहे, असे डॉ. प्रीती काबरा यांनी म्हटले आहे.