शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 14, 2016 02:36 IST

शहरात दुचाकी व चारचाकींच्या निर्माण झालेला महापूर आणि शहरातून जाणाऱ्या वाहनांचा वाढता आलेख अशा परिस्थितील

अनधिकृत टपऱ्या : पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात पुसद : शहरात दुचाकी व चारचाकींच्या निर्माण झालेला महापूर आणि शहरातून जाणाऱ्या वाहनांचा वाढता आलेख अशा परिस्थितील सर्वसामान्य पादचाऱ्याला रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. आता तर हक्काचे पदपथही गायब होवू लागले आहेत. ठिकठिकाणी पदपथावर आणि मोक्याच्या ठिकाणी टपऱ्या उभारून दुकानदारी थाटली आहे. वाहतुकीच्या कोंडीला आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या मोहिमेला रोखणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुसद शहरात महत्त्वाचे रस्ते वगळता अंतर्गत रस्ते विकासाला चालना मिळाली नाही. ज्यांनी शहराचे नियोजन करावयाचे अशा नगरसेवकांनीच आपापल्या भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाला आजपर्यंत कडाडून विरोध केला. यामुळे पुसद शहराची ओळख खड्ड्याचे शहर अशी झाली. गेल्या काही वर्षात रस्ते विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वाचे रस्ते रुंद होण्याच्या कामाला गती मिळाली. या रस्त्याकडेला अरुंद का असेनात पण पादचाऱ्यांसाठी पदपथाची व्यवस्था करण्यात आली होती. हे पदपथ सध्या टपऱ्यांनी व्यापू लागले आहेत. कोणीही यावे आणि टपरी टाकावी अशी अवस्था झाली आहे. संबंधित टपऱ्यांचे आश्रयदाते पडद्यामागून ही सारी सूत्रे हलविताना दिसताहेत. या टपरीधारकांकडून भाडेपट्टी आणि संरक्षणाच्या नावाखाली हजारो रुपयांची खंडणी गोळा करण्याचे काम काही गावगुंडांनी आपल्या हाती घेतले आहे. दुर्दैवाने या रस्त्यालगत वेगाने उभारल्या जाणाऱ्या अतिक्रमणांकडे नगरपालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेला लक्ष द्यायला वेळ दिसत नाही. या सर्वांमध्ये शहरात पादचाऱ्यांची सुरक्षितता तर धोक्यात आली आहेच. शिवाय खंडणीच्या रूपाने पुसद शहरात गुन्हेगारीलाही मोठ्या प्रमाणात बळ मिळू लागले आहे. पुसद शहरात फेरफटका मारला तर शहरामध्ये दिवसेंदिवस रस्त्यांकडेला पदपथावर उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांची समस्या किती गंभीर होत चालली आहे याची कल्पना येवू शकते. रस्त्यावर पहिला हक्क हा पादचाऱ्यांचा असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असताना शहरात आज सरकारी जागांवर अतिक्रमण काढल्याने आज रस्त्याचा हक्कदार असलेला पादचारी मात्र जीव मुठीत धरून चालताना दिसतो आहे. तेव्हा प्रशासनाला केव्हा जाग येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)