शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

विशाल ठरला बँक कर्जाच्या तगाद्याचा बळी

By admin | Updated: December 20, 2015 02:32 IST

शेतात पिकत नव्हते, तरीही या-त्या बँकेकडून कर्ज काढून शेतीला लावत होते. बँकांचे पैसे थकले.

पत्नीचा आक्रोश : कर्ज काढून खोदलेल्या विहिरीतच आत्महत्याकिशोर वंजारी नेरशेतात पिकत नव्हते, तरीही या-त्या बँकेकडून कर्ज काढून शेतीला लावत होते. बँकांचे पैसे थकले. मुद्दलाऐवढेच व्याज झाले. बँकेचे माणसं घरापर्यंत येऊन वसुलीचा तगादा लावायचे. पैसे भरले नाही तर शेताचा लिलाव करून कोर्टाची नोटीस पाठवू, अशा धमक्या देत होते. याच तगाद्याने जीवन जगणे असह्य झाल्याने माझ्या पतीने आत्महत्या केली, असा आरोप विशालची पत्नी मायाने केला. तालुक्यातील मारवाडी येथील विशाल नामदेव पवार (३५) या शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी आपल्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. पालकमंत्र्यांच्या नावाने विनंती पत्र त्याने लिहिले होते. विशाल हा प्रचंड मेहनती शेतकरी होता. स्वत:च्या शेतीसोबतच तो मक्त्याने शेती करून आपल्यावरील कर्ज फेडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र निसर्ग त्याला साथच देत नव्हता. त्यामुळे त्याने विविध बँकांतून घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता भरता आला नाही. याच बँकांनी लावलेल्या तगद्याने शेवटी त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. विशालने १४ सप्टेंबर २०१२ रोजी नेर अर्बन पतसंस्थेकडून दीड लाख रुपयाचे कर्ज उचलले होते. मात्र नापिकीमुळे एक रुपयाही तो भरू शकला नाही. या दीड लाखावर ८० हजार ९२९ रुपये व्याज झाले आहे. या कर्जासाठी त्याने स्वत:चे घर गहान ठेवले होते. गतवर्षी यवतमाळच्या एका कृषी केंद्रातून अडीच लाखांचे उधारीवर बियाणे आणि शेतीसाहित्य खरेदी केले होते. तेही पैसे तो फेडू शकला नाही. पाच वर्षांपूर्वी त्याने यवतमाळच्या राजलक्ष्मी पतसंस्थेतून ७५ हजार रुपये कर्ज काढले होते. या कर्जावर मुद्दलऐवढेच व्याज झाले. दीड लाख रुपये या बँकेचे अंगावर कर्ज होते. एका शिक्षकाकडून २० हजार रुपये कजाऊ घेतले होते. मुद्द दिल्यानंतर कर्जाच्या रकमेसाठी विशालने त्या शिक्षकाला धनादेश दिला. परंतु तो अनादरित झाल्याने सदर शिक्षकाने न्यायालयात केस दाखल केली. या सोबतच युनियन बँक आणि स्टेट बँकेचेही कर्ज असल्याची माहिती आहे. त्याच्या सातबारावर साडेचार लाख रुपयांचा बोझा आहे. कोणत्याही बँकेने नोटीस बजावली नसली तरी शेताचा लिलाव करून कोर्टात प्रकरण नेऊ, असे बँकेचे कर्मचारी धमकी देत होते. या सर्व प्रकाराने विशाल हतबल झाला होता, असे पत्नीने सांगितले.