शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रोपे नेणाऱ्या वाहनाचे भाडे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST

महागाव : वनविभागाच्या नांदगव्हाण येथील रोपवाटिकेत खासगी ट्रॅक्‍टरच्या साह्याने विविध कामे करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाचे पैसे वनविभागाच्या यंत्रणेने परस्पर हडप ...

महागाव : वनविभागाच्या नांदगव्हाण येथील रोपवाटिकेत खासगी ट्रॅक्‍टरच्या साह्याने विविध कामे करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाचे पैसे वनविभागाच्या यंत्रणेने परस्पर हडप केले. रात्रंदिवस कष्ट करून वनविभागाकडे शिल्लक राहिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे ट्रॅक्टर मालक गणेश परसराम राठोड रा. नांदगव्हाण यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

गणेश राठोड हे सातत्याने आपल्या वाहनाचे भाडे मागण्यासाठी वनविभागाच्या पायऱ्या झिजवत आहेत. राठोड यांनी लेखी अर्जाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे. वनविभागाने भाडे तत्वावर लावलेल्या वाहनाचे भाडे स्वतः गिळंकृत केले की काय, अशी शंका व्यक्त केली जात असून मध्यवर्ती रोप वाटिकेच्या कामाची चौकशी करण्याची गरज आहे.

नांदगव्हाण येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत बाहेरून रोपे आणणे, नांगरणी करणे, मुळे काढणे, रोटावेटर करणे, माती, रेती आणि शेणखताची वाहतूक करणे यासाठी गणेश परसराम राठोड यांचे ट्रॅक्टर (क्र.एमएच २९ बीसी ३९७०) कंत्राटी पद्धतीने वनविभागाने भाडेतत्त्वावर वापरले. दरोगा बी.एन. खान आणि वनरक्षक येरवाळ यांच्याशी करार करून गणेश राठोड यांनी २०१९ ते २०२० या काळात आपल्या ट्रॅक्टरने कामे केली. परंतु वर्षभरापासून या कामाचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. आपल्या परिश्रमाचे वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्यामुळे गणेश राठोड यांनी महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.