गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशी जणू काही स्थितीच निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे.खऱ्या अर्थाने रविवार, ८ एप्रिलपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. रात्री बारा वाजता पूर्ण गावाने अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापनाचा निर्धार केला. सुरुवातील गावातील मालती महाजन, उषा नेहारे, प्रीतम वाघमारे, वैभव नागोसे व रामचंद्र वºहाडे यांनी स्पर्धेसंबधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना उपसरपंच अनिता खोकले, पोलीस पाटील नारायण वºहाडे, शिक्षक सचिन मेश्राम, गणेश वºहाडे, विनोद नेहारे, प्रवीण नागोेसे, साहेबराव वºहाडे, सुभाष नेहारे, सुरेश जुनगरे आदींची साथ लाभली.विशेष म्हणजे गावातील सर्वच वयोगटातील सदस्य या कामात स्वयंस्फूर्तीने उतरला आहे. मालती महाजन यांच्या पुढाकारातून सर्वच बचत गटाने प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत दिली. हाच आदर्श ठेवत इतरांनीही आपला वाटा उचलला. विशेष म्हणजे सत्यसाई सेवा समितीने या गावाला दत्तक घेतले. त्यामुळे येणाºया काळात गावात सकारात्मक बदत घडून येणे क्रमप्राप्त झाले आहे.दिव्यांगाचे श्रमदान ऊर्जा देणारेछत्रपती भागोजी किन्नाके हे एका पायाने पूर्ण अपंग आहे. त्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. एक वयोवृध्द अपंग व्यक्ती करू शकते, तर आपण का नाही? अशी भावनाही यानिमित्ताने अनेकांच्या मनात जागृत झाली आहे.तहसीलदाराचे प्रोत्साहनस्पर्धेच्या माध्यमातून गावे पाणीदार व्हावीत, यासाठी प्रशासनही सरसावले आहे. तहसीलदार रणजित भोसले यांनी बहुतांश वेळ गावकºयांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात दिला आहे. आजही त्यांनी इचोरा व नरसापूर येथे श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले. तहसीलदार रणजित भोसले यांची पाणीदार गावासाठी असलेली पोटतिडक अनेक गावांसाठी टानिकचे काम करणारी ठरत आहे.अनेक गावात प्रयत्नांची पराकाष्टाइचोरा येथील नागरिक ज्याप्रमाणे प्रेरीत होऊन कामाला लागले, तशीच स्थिती तालुक्यातील अनेक गावाची आहे. यामध्ये नरसापूर, पोटगव्हाण, नांझा, गणेशवाडी, पालोती, सावंगी (डाफ), रासा, गांढा आदी गावाचा समावेश आहे. त्यामुळे या गावातही पेटलेल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी विझविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे.
एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:33 IST
सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला.
एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या!
ठळक मुद्देरात्रीचे बारा अन् इचोरात कामाला सुरुवात : पाणीदार गावासाठी नागरिक सरसावले