शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

आदिवासींचा विकास खुंटला

By admin | Updated: November 24, 2015 05:33 IST

येथील आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या २१ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, २० आदिवासी मुला-मुलींची वसतिगृहे

२६१ जागा रिक्त : पांढरकवडा प्रकल्पात विविध योजनांचा खेळखंडोबाप्रवीण पिन्नमवार ल्ल पांढरकवडायेथील आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या २१ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, २० आदिवासी मुला-मुलींची वसतिगृहे तसेच प्रकल्प कार्यालयांतर्गत ८६६ मंजूर पदांपैकी ६०५ पदे भरण्यात आली. मात्र अद्याप २६१ पदे रिक्त असल्याने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी असलेल्या या कार्यालयाचा वेग मंदावला आहे. परिणामी आदिवासी बांधव, विद्यार्थी विविध योजना आणि विकासापासून वंचित राहात आहे.येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत एकूण २१ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, २० आदिवासी मुला-मुलींची वसतिगृहे चालविण्यात येतात. या सर्व ठिकाणी असलेल्या रिक्त पदांमुळे अनेक योजना व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे आदिवासी बांधव विकासापासून वंचित राहात आहे. येथील प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचे मंजूर असलेले एक पद अद्याप रिक्त आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची (शिक्षण) चार पदे रिक्त आहे. नियोजन अधिकारी १, गृहप्रमुख १, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या एकूण १२ जागा मंजूर आहे. त्यापैकी केवळ एकच कर्मचारी कार्यरत असून ११ जागा अद्याप रिक्तच आहे. निम्न श्रेणी लघुलेखक १, लघु टंकलेखक १, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक १, आदिवासी विकास निरीक्षक ३, वरिष्ठ लिपीक २, वाहन चालक २, माध्यमिक मुख्याध्यापक २, माध्यमिक शिक्षक १५, पदवीधर प्राथमिक शिक्षक ७, प्राथमिक शिक्षकांची तब्बल ४७ पदे रिक्त आहेत. पुरूष अधीक्षक ४, स्त्री अधीक्षीका ५, कनिष्ठ लिपीक (प्रकल्प कार्यालय) १०, कनिष्ठ लिपीक (आश्रमशाळा) ५, कनिष्ठ लिपीक (वसतिगृह) ३, प्रयोगशाळा परिचर ९, स्वयंपाकी ४३, कामाठी तब्बल ४७, शिपाई (प्रकल्प कार्यालय) ३, शिपाई (आश्रमशाळा) ८, शिपाई (वसतिगृह) ४ पदे रिक्त आहे. या व्यतिरिक्त चौकीदार (आश्रमशाळा) ७, सफाईगार (आश्रमशाळा) ११, सफाईगार (वसतिगृह) ३ जागा रिक्त आहे. आदिवासीबहुल तालुक्यातील अनेक कुटुंबे अद्याप शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहात असल्याचेही समोर येत आहे. आदिवासी जातीचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासा व्हावा, म्हणून आदिवासी विभागाचे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय येथे स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून आदिवासींचा विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. परंतु आदिवासी जमाती अनेक योजनांपासून रिक्त पदांमुळे वंचित राहात आहे. या रिक्त पदांमुळे आदिवासी बांधवांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास झाला नाही. अनेक आदिवासी कुटुंबांना प्रकल्प कार्यालयातर्फे कोणत्याही योजना देण्यात आल्या नाही. त्यामुळे हे आदिवासी बांधव विकासापासून अद्याप वंचितच आहे. आदिवासी बांधवांकडून व विद्यार्थ्यांकडून अनेकदा या कार्यालयाविरूद्ध रोष व्यक्त होत आहे. ही रिक्त पदे भरून आदिवासी जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. ‘आयएएस’ पीओ देण्याची मागणी४प्रकल्प कार्यालय यापूर्वी विविध घोटाळ्यांनी गाजले होते. तसेच या कार्यालयाचा अवाका व कारभार बघता येथे आयएएस दर्जाचाच प्रकल्प अधिकारी देण्यात यावा, ही मागणी आदिवासी बांधव करीत आहे. मात्र अद्यात ही मागणी अपूर्णच आहे. यापूर्वी प्रेरणा देशभ्रतार येथे प्रकल्प अधिकारी म्हणून लाभल्या होत्या. मात्र त्यांना अल्प काळ काम करता आले. आता नव्याने येथे आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे. सोबतच रिक्त पदे तातडीने भरावी, अशीही मागणी आहे.चार आश्रमशाळा रिक्त पदांमुळे बंद४या प्रकल्प कार्यालयांतर्गत येणारा चार आदिवासी आश्रमशाळा रिक्त पदांमुळे बंद पडल्या आहेत. येथील प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात एकूण ८६६ पदे मंजूर आहे. त्यापैकी तब्बल २६१ पदे अद्याप रिक्त आहे. रिक्त पदांमुळे पवनार, बोरी (खु.), बोपापूर, वाई गुरूद्वारा व मानकापूर येथील शाळाच सध्या बंदच आहे. त्यामुळे या शाळा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे आदिवासींचा किास तरी होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.