शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नाईलाजाने व्यापाऱ्यांच्या दारी

By admin | Updated: May 18, 2017 00:47 IST

यंदा पावसाळा लवकर आहे, शेतीच्या मशागतीच्या कामांना अद्याप हात लागलेला नाही. शेतकरी गेल्या वर्षीच्या तुरी विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मुक्कामी आहेत.

साडेतीन हजाराने तुरीची विक्री : बाजार समित्यांमध्ये आता मुक्कामाला वेळ नाही, शेतीच्या मशागतीची लगबग लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यंदा पावसाळा लवकर आहे, शेतीच्या मशागतीच्या कामांना अद्याप हात लागलेला नाही. शेतकरी गेल्या वर्षीच्या तुरी विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मुक्कामी आहेत. सरकार हमी भावाने तूर खरेदीचे आश्वासन देत असले तरी त्यासाठी असलेले खरेदी केंद्र आणि तेथील गती पाहता सरकारच्या प्रामाणिकपणाबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे. अखेर याच कारणावरुन शेतकऱ्यांनी नाईलाजाने व्यापाऱ्यांना अवघ्या साडेतीन हजार ते तीन हजार ८०० रुपये क्ंिवटल दराने तुरी विकणे सुरू केले आहे. पुढील हंगामासाठी शेतीच्या मशागतीचे कामे करायची असल्याने बाजार समित्यांमध्ये तूर खरेदीच्या प्रतीक्षेत थांबायला वेळ कुणाकडे आहे, हा एका शेतकऱ्याचा बोलका प्रश्न आहे. आणखी काही दिवस शेतकऱ्यांनी मुक्काम केले तरी त्याच्या तुरीची खरेदी होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजपा-सेना युती सरकारच्या कारभाराला कंटाळून अखेर व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात तुरी विकण्याचा निर्णय शेकडो शेतकऱ्यांना घ्यावा लागला आहे. हमी भावाने तूर खरेदीसाठी शासनाने धरून-बांधून उभ्या केलेल्या यंत्रणेत समन्वय व एकमताचा अभाव दिसतो. ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारुन नेण्याचा व शेतकरी, सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आमदारांची नेमकी बांधिलकी कुणाशी ? तुरीच्या प्रश्नावर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सत्ताधारी मंडळी वेळ काढू घोषणा करीत आहे. विरोधी पक्षही फोटोछाप आंदोलन करीत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर आमदार मंडळी निवडून आली, त्यापैकी कुणीही तुरीच्या विषयावर आक्रमक भूमिका घेण्यास तयार नाही. सत्ताधारीच नव्हे तर विरोधी बाकावरील आमदारांचीही हीच स्थिती आहे. ते पाहता निवडून आलेली ही आमदार मंडळी सरकारची, पक्षाची की शेतकरी-जनतेची असा प्रश्न उपस्थित केला जातो.