शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी सुरूच राहणार

By admin | Updated: March 2, 2017 00:48 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची तूर शासकीय

जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना ग्वाही : पाच लाख क्विंटल वाढीव खरेदीचा प्रस्ताव, घरूनच मिळणार टोकन यवतमाळ : शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची तूर शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी होणार आहे. त्यासाठी घरूनच अथवा बाजार समितीत पोहोचून टोकन पद्धतीने नाव नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांना दिले. बाजार समिती सभापतींच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा क्रमांक असेल, त्याच दिवशी शेतकऱ्यांनी केंद्रावर येण्याच्या सूचना जिल्ह्यातील बाजार समितींना देण्यात आल्या आहे. १५ मार्चनंतर केंद्र बंद होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. हे केंद्र शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, खुल्या बाजारात पडलेल्या दरात तूर विकू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी बाजार समितीच्या सभापतींमार्फत शेतकऱ्यांना केले. त्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी सभापतींना दिली. सध्या बाभूळगाव, कळंब, आर्णी, राळेगाव आणि घाटंजी येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले. शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्य शासनाच्या धोरणांची माहिती त्यांना दिली. शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावरच तूर विकावी. याकरिता शेतकऱ्यांनी बाजार समितीत आपले नाव नोंदवावे आणि टोकन पद्धतीने क्रमांक लावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक बाजार समितींचे सभापती, संचालक उपस्थित होते. (शहर वार्ताहर) लाल, पांढरा दाणा भेद नको शासकीय तूर खरेदी केंद्रांवर लाल आणि पांढरा दाणा, असा भेद होत आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी असा भेदाभेद न करता तूर खरेदी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बैठकीत दिली. यासोबतच निर्यात धोरण व आयात होणाऱ्या तुरीवरून हटविण्यात आलेल्या करावर निर्णय होणार आहे. यातून मोठे फेरबदल होतील. त्यामुळे तुरीचे भाव वाढतील, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी घाई न करता तुर विकण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.