शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे; महाविकास आघाडीची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 14:22 IST

उपाध्यक्षपदी संजय देरकर, वसंत घुईखेडकर

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर १६ सदस्य असलेल्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी वणी येथील काँग्रेसचे टिकाराम कोंघरे बिनविरोध निवडून आले. उपाध्यक्षपदी वसंत घुईखेडकर व संजय देरकर यांची वर्णी लागली. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांची सरशी झाल्याचे सांगितले जाते. कारण कोंघरे व देरकर हे दोघेही वणीतील असून धानोरकर यांचे समर्थक मानले जातात. 

सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. भाजप समर्थित पॅनलकडून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही अध्यक्ष पदासाठी गेली चार दिवस जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र महाविकास आघाडीत फूट पाडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी नामांकन दाखलच केले नाही. पर्यायाने बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. अध्यक्ष पदासाठी खासदार धानोरकर यांनी नवा चेहरा द्यावा म्हणून वणीच्या टिकाराम कोंघरे यांचे नाव रविवारपासूनच रेटले होते. सोमवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदाचा र्फाम्युला ठरविण्यात आला.

पहिले तीन वर्ष अध्यक्षपद कोंघरे यांच्याकडे, तर नंतरचे दोन वर्ष मनिष पाटील यांच्याकडे राहील, असे सूत्र ठरविण्यात आले. उपाध्यक्षांची दोन पदे अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीला देण्यात आली. शिवसेनेकडून सुरुवातीला राजुदास जाधव, तर राष्ट्रवादीकडून प्रा. शिवाजी राठोड यांचे नाव निश्चित केले गेले. मात्र दोनही पक्षात अखेरच्या क्षणी चक्रे फिरली आणि दोनही नावे बदलविण्यात आली.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना मुंबईहून फोन आल्याने प्रा. राठोड यांच्याऐवजी उपाध्यक्षपदी वसंत घुईखेडकर यांना संधी देण्यात आली, तर शिवसेनेने राजुदास जाधव ऐवजी वणीच्या संजय देरकरांना संधी दिली. अखेर ठरल्याप्रमाणे बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे, तर उपाध्यक्षपदी वसंत घुईखेडकर व संजय देरकर बिनविरोध निवडून आले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

तब्बल १३ वर्षानंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. २१ पैकी सर्वाधिक १६ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तीन जागांवर भाजप समर्थित पॅनल, तर दोन जागांवर अपक्ष निवडून आले. त्यानंतरही भाजप समर्थित पॅनलच्या एका नेत्याने आघाडीत बिघाडी करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र त्यात त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता दोन स्वीकृत सदस्य (तज्ज्ञ संचालक) आणि राज्य सहकारी बँकेवरील प्रतिनिधीच्या निवडीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. राज्य बँक प्रतिनिधी काँग्रेसचा, तर स्वीकृत सदस्य अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीचा असे ठरले. सेनेकडून नेत्याच्या कौटुंबिक सदस्यालाच स्वीकृत सदस्यपदी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीYavatmalयवतमाळ