शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगी येथे तणावपूर्ण शांतता

By admin | Updated: March 2, 2017 00:56 IST

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे कृषी केंद्र संचालकांना मारहाण करून जवळपास नऊ लाख रुपयांची

बाजारपेठ बंद : आरोपीच्या अटकेसाठी शुक्रवारचा ‘अल्टीमेटम’ फुलसावंगी : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे कृषी केंद्र संचालकांना मारहाण करून जवळपास नऊ लाख रुपयांची रोकड चार ते पाच आरोपींनी लुटून नेली. याप्रकरणी गावात तीव्र रोष असून, सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावी, यासाठी फुलसावंगी येथे व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. शुक्रवारपर्यंत पोलिसांना नागरिकांनी अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान महागाव येथे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता असून, महागाव पोलिसांसह दंगल नियंत्रक पथक गावात तळ ठोकून आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील कृषी केंद्र चालकाला खंडणीसाठी धमकावून त्यानंतर सशस्त्र हल्ला करून लुटले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव पोलिसांच्या मदतीने तातडीने दोन आरोपींना मंगळवारीच अटक केली आहे. यामध्ये यवतमाळच्या चमेडियानगरातील कुख्यात मोबीनचा सहभाग असल्याचे तपासून पुढे आले आहे. पोलिसांनी निंगनूर शिवारात शोध घेतला असता फुलसावंगीतील विधीसंघर्षग्रस्त बालक आणि यवतमाळच्या चमेडियानगरातील मोबीन शेख इसराईल (२७) हा कुख्यात आरोपी पोलिसांच्या हाती लागला. इतर दोन आरोपी पसार झाले. या दोघांकडून लुटीचा मुद्देमाल मिळाला नाही. उर्वरित दोघे हा मुद्देमाल घेऊन पळाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा फुलसावंगी येथे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. सर्व लुटारूंना अटक करावी आणि व्यापारी तथा सर्वसामान्य नागरिकांना गुंडापासून संरक्षणाची हमी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांची आणि जनतेची आहे. त्यासाठी शुक्रवारपर्यंत पोलिसांना जनतेकडून मुदत देण्यात आली आहे. (वार्ताहर)