लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून वणी वनपरिक्षेत्रात वाघांकडून पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले केले जात असल्याने अनेक गावांमध्ये दहशतीचे वातावरण असतानाच शनिवारी व रविवारी लागोपाठ वाघाने गोडगाव भागात दोन गायींचा फडशा पाडला. विशेष म्हणजे सन २०१५ मध्ये याच गावातील एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते.वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडगाव येथीलच संजय काळे यांच्या मालकीची गाईवर हल्ला चढवून तिला ठार मारले. विशेष म्हणजे देवीदास निब्रड यांच्या गाईवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या घटनास्थळापासून केवळ ७० मिटरवर ही घटना घडली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील अनेक गावे दहशतीखाली आली आहेत. वाघाच्या भीतीने नागरिक जंगलात, शेतशिवारात जाणे टाळत आहेत. घटनेची माहिती मिळताच, वणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवीदास निब्रड यांची गाईवर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, तेथे चार ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, तर संजय काळे यांच्या गाईवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथे दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वन विभाग वाघाच्या हालचालीवर ‘वॉच’ ठेवून आहे.वणी वनपरिक्षेत्रात तीन वाघांचा वावर असून तीन दिवसांपूर्वी पुनवट शेतशिवारात कापूस वेचत असलेल्या महिलेला वाघाने दर्शन दिले होते. त्यामुळे या परिसरातही वाघाची दहशत आहे. वाढते व्याघ्रहल्ले लक्षात घेता, वन विभागाने सतर्कता बाळगली असून ज्या परिसरात वाघाचा वावर आहे, त्या परिसरात गस्त वाढविली आहे. गोडगाव या गावापासून घटनास्थळ केवळ तीन किलोमिटर अंतरावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून गोडगाव जंगल परिसरात गस्त घालत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना या पथकाकडून दिल्या जात आहेत. गोडगावलगतचे जंगल घनदाट असून या जंगलात रोही, रानडुकरांची संख्या मोठी आहे. जंगलात पाणवठे असल्याने वाघाला हे जंगल सर्वदृष्टया सुरक्षित वाटत असल्याने हा वाघ याच जंगलात भटकत आहेत. जंगली श्वापदांसोबतच जंगलात चराईसाठी येणाºया पाळीव जनावरांनाही या वाघाने लक्ष्य बनविले आहे.चराईसाठी जनावरे नेण्यास केली मनाई४शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस गोडगावच्या जंगलात गाईवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार मारले. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पाळीव जनावरे संबंधित जंगलात नेण्यास मज्जाव केला असून दुसºया जंगलात चराईसाठी जनावरे न्यावी, असे आवाहन केले आहे.
वणी वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST
वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडगाव येथीलच संजय काळे यांच्या मालकीची गाईवर हल्ला चढवून तिला ठार मारले.
वणी वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ
ठळक मुद्देअनेक गावे दहशतीखाली : गोडगाव भागात दोन दिवसांमध्ये दोन गाईंचा फडशा