शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवरील अत्याचारात तिघे गजाआड

By admin | Updated: September 10, 2016 00:48 IST

येथील ड्रीम्स प्ले स्कूलमधील चिमुरड्या विद्यार्थ्यांवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह तिघांना

वणी येथील ड्रीम्स प्ले स्कूल : महिलेचा समावेश, तीन दिवसांची पोलीस कोठडी वणी : येथील ड्रीम्स प्ले स्कूलमधील चिमुरड्या विद्यार्थ्यांवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह तिघांना यवतमाळच्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पालकांच्या तक्रारीवरुन गुरुवारी उशिरा रात्री या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे. येथील छोरीया ले-आऊट परिसरात ड्रीम्स प्ले स्कूल आहे. तेथील चिमुरड्या विद्यार्थी-विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून स्कूल बसचालक सुरेंद्र उर्फ बंडू साव, करण ब्राह्मणे बसमधून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बसमध्येच लैंगिक छळ करीत होते. याच बसवर कार्यरत महिला या कामी त्यांना मदत करीत होती, अशी सामूहिक तक्रार गुरूवारी आठ पालकांनी वणी पोलीस ठाण्यात केली. काल रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी यवतमाळ येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम येथे आल्या होत्या. त्यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. या प्रकरणात गुरूवारी रात्री उशिरा आरोपी बसचालक सुरेंद्र उर्फ बंडू साव, करण ब्राह्मणे याच्यासह एक महिलेविरुद्ध भादंवि ३७६, २ आय, ३५४ अ (१), ३५४ ब, ५०६, १०९ पोस्को कायद्याच्या कलम ४,८,१२,२१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या तिघांनाही गुरूवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी दुपारी वणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे यांच्या नेतृत्वातील पथक आरोपींना घेऊन यवतमाळ येथील न्यायालयापुढे हजर करण्यासाठी रवाना झाले. न्यायालयाने तीनही आरोपींना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता दरम्यान या प्रकरणी सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी शनिवारी वणी बंदचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणाचे तपास अधिकारी मुकूंद कुळकर्णी यांनी धर्मदाय आयुक्त व तालुका दुय्यम सहाय्यक निबंधकांना पत्र लिहून ड्रीम्स प्ले स्कूल कोणत्या संस्थेअंतर्गत सुरू आहे व त्याचे संचालक कोण आहेत, अशी विचारणा करणारे पत्र पाठविले. सोमवारी या पत्राचे उत्तर मिळल्यानंतर या प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता कुळकर्णी यांनी व्यक्त केली.