शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद ठप्पच

By admin | Updated: April 20, 2017 00:22 IST

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे.

यवतमाळ : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे. विषय समित्यांचे गठन रखडल्याने सर्वच विभागांचा मासीक आढावा गुलदस्त्यात आहे. जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू झाली. त्याच महिन्यात तत्कालीन काही विषय समितींची शेवटची बैठक झाली. त्यानंतर अद्याप सर्व विभागांची बैठकच झाली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना आचारसंहिता व निवडणुकीत गेला. २३ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर मार्चमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. तोपर्यंत जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीविहीन होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड झाली खरी, मात्र अद्याप समित्यांचे गठन झाले नाही. त्यामुळे दोन सभापती केवळ नाममात्र ठरले. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात कोणत्याच विभागाची मासिक आढावा बैठक झाली नाही. परिणामी जिल्हा परिषद ठप्प पडल्याचे दिसून येत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश देणे सुरू केले. मात्र संबंधित विभागांचा मासीक आढावा अद्याप कुणीच घेतला नाही. त्यामुळे सर्वच विभाग प्रमुख निर्धास्त आहे. पुन्हा किमान महिनाभर तरी विषय समितीची मासीक बैठक होण्याची शक्यता नाही. समिती गठनानंतरच ती होणार आहे. तोपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसारच कामकाज चालणार आहे. जिल्हा परिषदेचे संपूर्ण नियंत्रण संपूर्णणे प्रशासनाच्या हाती एकवटले आहे. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रशासनाचे ‘कासरे’ आपल्या हातात ओढण्यासाठी प्रयत्नरत आहे. मात्र जोपर्यंत सर्वसाधारण सभा होत नाही, तोपर्यंत प्रशासन वरचढ राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)