शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यासह तीन जण ठार

By admin | Updated: December 17, 2015 02:24 IST

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. यवतमाळजवळील चापडोह वळणावर दुचाकी ...

दोन अपघात : दिग्रसजवळ आॅटोरिक्षा उलटला, चापडोहोत दुचाकीला व्हॅनची धडक यवतमाळ/दिग्रस : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. यवतमाळजवळील चापडोह वळणावर दुचाकी अपघातात अभियंता ठार तर दिग्रस तालुक्यातील सिंगदजवळ आॅटोरिक्षा उलटल्याने चालकासह दोन जण मृत्युमुखी पडले. यवतमाळ-घाटंजी मार्गावर दुचाकीला मारुती व्हॅनने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता मनोज बळीराम मरापे (३५) रा. पार्डी नस्करी ता. घाटंजी हे जागीच ठार झाले. ते बुधवारी सकाळी ९.३० वाजता आपल्या दुचाकीने (एम.एच.२९-एस-१९४) पार्डीनस्करीवरून यवतमाळकडे येत होते. चापडोह वळणावर त्यांच्या दुचाकीला घाटंजीकडे जाणाऱ्या मारुती व्हॅनने (एम.एच.२९-आर-३८५) जबर धडक दिली. यात मनोज दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी भास्कर गणपत धुर्वे (रा. वसंतनगर) ता. घाटंजी यांनी तक्रार दाखल केली आहे. घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम मरापे यांचा तो मुलगा होता. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. दुसरा अपघात दिग्रस-पुसद मार्गावरील सिंगद गावाजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडला. सुभाष संगीतराव इंगळे (३५) रा. बोरी पुनर्वसन ता. दिग्रस आणि आॅटोरिक्षा चालक फैमोद्दीन शहाबुद्दीन (२५) रा. जांबबाजार ता. पुसद असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे. हे दोघेही दिग्रसकडून पुसदकडे आॅटोरिक्षाने (एम.एच-२९-डब्ल्यू-९५०३) जात होते. त्या वेळी सिंगद गावाजवळ आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. त्यात दोघेही जागीच ठार झाले. सुभाषच्या मागे पत्नी, तीन मुले, मुलगी, असा परिवार आहे. तर फैमोद्दीनच्या मागे पत्नी, मुलगा-मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)