शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री तीन बसेसची तोडफोड

By admin | Updated: June 2, 2014 01:48 IST

‘जय भवानी जय शिवाजी’ असे नारे लावत दुचाकीवरुन आलेल्या सहा ते सात तरुणांनी ..

यवतमाळ : ‘जय भवानी जय शिवाजी’ असे नारे लावत दुचाकीवरुन आलेल्या सहा ते सात तरुणांनी एका आईस्क्रिम पार्लरवर दगडफेक केली. त्यानंतर बसस्थानकात शिरून दोन बसेसच्या काचा फोडल्या. त्यातीलच एका बसवर रॉकेल ओतून जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर दारव्हा नाक्यावर एक बस अडवून तोडफोड करण्यात आली. ३१ मेच्या रात्री ११ वाजतापासून सुरू झालेल्या या घटनांनी संपूर्ण शहरातच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वडगाव रोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जाजू चौकातील एका आईस्क्रिम पार्लरसमोर रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास चार दुचाकीवरून तरुणांचे टोळके आले. नारेबाजी करीत या तरुणांनी आईस्क्रिम पार्लरवर दगडफेक केली. या वेळी पार्लरचालक आणि नोकरांनी प्रसंगावधान राखून तत्काळ शटर खाली ओढले. त्यामुळे नुकसान टळले. त्यानंतर या टोळक्याने बसस्थानकाकडे आपला मोर्चा वळविला. आतमध्ये शिरून गंगापूर आगाराची औरंगाबाद - यवतमाळ मुक्कामी बस (एमएच-२0-बीएल-२७९३) वर या टोळक्याने दगडफेक केली. त्यामध्ये संबंधित बसच्या समोरील काचा फुटल्या. या घटनेनंतर बाजूलाच असलेल्या नेर आगाराच्या बस (एमएच-४0-एन-८१२६) वर देखील दगडफेक केली. त्यामध्ये संबंधित बसच्या समोरील काचा फोडल्या. त्यानंतर टोळक्याने रॉकेल ओतून ही बस जाळण्याचा प्रयत्न केला. ही बाब प्रवाश्यांच्या लक्षात आली. ते टोळक्याकडे धावले. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण तेथून भरधाव पसार झाले. तेथून ते दारव्हा मार्गावर गेले. या वेळी दारव्हा नाका परिसरात नागपूर-दारव्हा या धावत्या बस (एमएच-४0-एन-८५६९) वर टोळक्याने अचानक दगडफेक केली. चालकाने प्रसंगावधान राखून वाहन नियंत्रित केले. तसेच दगडफेक थांबेस्तोवर प्रवासी आणि चालक-वाहक बसमध्येच दडून राहिले. त्यानंतर टोळके तेथूनही पसार झाले. या तीनही घटनांची माहिती यवतमाळ शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन विविध अफवांना पेव फुटले होते. टोळक्याच्या या घटनाक्रमानंतर पोलीस खडबडून जागे झाले. वडगाव रोड, यवतमाळ शहर, स्थानिक गुन्हे शाखा, चार्ली कमांडो आदी पथक रस्त्यावर उतरले. त्यामुळे संपूर्ण शहरालाच छावणीचे स्वरुप आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)